Congress MLA recommends Nitin Gadkari as India’s next Prime Minister following RSS chief's remarks on retirement Saam tv
देश विदेश

Politics : नरेंद्र मोदी निवृत्त झाल्यावर नितीन गडकरींना पंतप्रधान बनवा; मोहन भागवतांच्या वक्तव्यावर काँग्रेस आमदाराची मागणी

belur gopal krishna : मोहन भागवतांच्या वक्तव्यावर काँग्रेस आमदाराने मोठं विधान केलं आहे. नरेंद्र मोदी निवृत्त झाल्यावर नितीन गडकरींना पंतप्रधान बनवा, असं काँग्रेस आमदाराने म्हटलं आहे.

Vishal Gangurde

काँग्रेसच्या एका आमदाराने नितीन गडकरी यांनी पंतप्रधान करण्याची मागणी केली आहे. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्या निवृत्तीवरील वक्तव्यावर काँग्रेस आमदाराने हे भाष्य केलं आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून निवृत्त झाल्यावर त्यांच्याजागी नितीन गडकरी यांना पंतप्रधान करायला हवं. नितीन गडकरी हेच पदासाठी योग्य व्यक्ती आहेत, असं काँग्रेस आमदाराने म्हटलं आहे.

७५ वर्ष पूर्ण झाल्यावर नेत्यांनी सरकारी पदावरुन निवृत्त झालं पाहिजे, असं आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. मोहन भागवत यांचं वक्तव्य नरेंद्र मोदी यांना इशारा असल्याचा काँग्रेस आमदाराने म्हटलं. दरम्यान, नरेंद्र मोदी हे याच वर्षी वयाची ७५ वर्ष पूर्ण करणार आहेत.

काँग्रेस आमदार बेलूर गोपालकृष्णा हे कर्नाटकातील सागर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. बेलूर यांनी म्हटलं की, नरेंद्र मोदी निवृत्त झाल्यानंतर नितीन गडकरी यांना पंतप्रधान करायला हवं. नितीन गडकरी हे पंतप्रधानपदासाठी पात्र आहेत'. नितीन गडकरी यांना देशातील गरीब लोकांची अधिक चिंता असल्याचंही बेलूर यांनी म्हटलं.

माध्यमांशी बोलताना काँग्रेस आमदार बेलूर गोपालकृष्ण म्हणाले की, 'भाजपने ७५ वर्ष झाल्यानंतर येदिरुप्पा यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं. त्यावेळी त्यांचे डोळे भरून आले होते. आता भाजपने आरएसएसच्या प्रमुखांचा सन्मान करायला हवा. वयानुसार निवृत्त होण्याचा फॉर्म्युला पंतप्रधानपदासाठी लागू असला पाहिजे'.

'देशात गरीबांची संख्या वाढू लागली आहे. श्रीमंत आणखी श्रीमंत होऊ लागले आहेत. देशाची संपत्ती काही लोकांच्या हातात जाऊ लागली आहे. त्यामुळे गडकरी हेच पदासाठी योग्य आहेत. भाजपच्या हायकमांडने याबाबत विचार करायला हवा, असंही बेलूर यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saina Nehwal: सायना नेहवाल - पारूपल्ली कश्यप विभक्त, ७ वर्षांचा सुखी संसार मोडला; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Plane Crash: उड्डाण घेताच काही सेकंदात विमान कोसळलं, उडाला मोठा भडका; परिसरात काळेकुट्ट धुरांचे लोट; अपघाताचा थराराक VIDEO

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT