Nitin Gadkari 
देश विदेश

Nitin Gadkari : टॉयलेटचे पाणी आणि कचऱ्यापासून बांधणार इमारती अन् हायवे, केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन, वाचा सविस्तर

Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन प्रोजेक्टबाबत माहिती दिली आहे. आता सांडपाणी आणि कचऱ्याचा वापर हा रस्ते आणि इमारती बांधण्यासाठी केला जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.

Siddhi Hande

सांडपाणी आणि कचऱ्याचा वापर करुन बांधणार इमारती

नितीन गडकरी यांनी दिली माहिती

नवीन प्रोजेक्त काय असणार?

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना हायवे मॅन म्हणून संबोधले जाते. आता नितीन गडकरी लवकरच रस्ते आणि इमारती बांधण्यासाठी मोठं पाऊल उचलणार आहे. देश प्रदुषणमुक्त होण्यासाठी आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन योजना सुरु करण्यात येणार आहे. देशात प्रदुषणाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी हा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. याबाबत निती गडकरी यांनी एका माध्यमाशी संवाद साधताना माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आता शौचालयाचे पाणी आणि कचरा वापरुन रस्ते आणि इमारती बांधल्या जातील.

नवीन प्रोजेक्ट काय असणार आहे?

नितीन गडकरी यांनी सांगितले की, रस्ते बांधणीदरम्यान ८ दशलक्ष टन घनकचरा टाकण्यात आला होता. या कचऱ्याचा वापर दिल्ली-मुंबई महागार्ग बांधण्यासाठी झाला होता.दरम्यान, आता सरकार २०२७ च्या अखेरीस देशातील सर्व घनकचरा वेगळा करुन त्याचा वापर रस्ते बांधण्यासाठी करण्याचा विचार करत आहे. यामुळे देशात खूप कमी प्रदुषण होईल.

शौचालयातील घाणेरड्या पाण्याचा वापर

दरम्यान, नितीन गडकरी यांनी सांडपाण्याचा वापर कसा करणार याबाबतही माहिती दिली आहे. शौचालयांमधील सांडणी ज्याचा पुनर्वापर केला जातो. या पाण्याचा पुनर्वापर आणि चाचणी केली जाईल आणि ते फिल्टर केलेले पाणी इमारत आणि रस्ते बांधकासाठी केले जातील. यासाठी आदेश जारी केला जाईल. यामुळे प्रदुषण कमी होईल.

देशात रोज लाखो टन कचरा आणि सांडपाणी तयार होते. यातील कचरा उघड्यावर टाकला जातो. हा कचरा पुढे नद्या, नाल्यांमध्ये जाऊन अडकतो. त्यामुळे प्रदुषण होते. यामुळे खूप अडचणी येतात. त्यामुळे हा प्रकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

भारतात हे तंत्रज्ञान पहिल्यांदाच वापरले जात नाही. युरोप आणि आशियामध्ये अशाच तंत्राचा वापर केला जातो. सांडपाण्यातील गाळ आणि कचऱ्याचा पुनर्वापर महामार्ग, उड्डाणपूल आणि इमारती बांधण्यासाठी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

SCROLL FOR NEXT