Kalyan : नाल्यातील सांडपाणी उल्हास नदीत; प्रदूषण नियंत्रण मंडळाची केडीएमसीला कारणे दाखवा नोटीस

Kalyan News : ठाणे जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या उल्हास नदी पात्रात अनेक नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातील घातक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे. यामुळे नदी पात्र प्रदूषित होत आहे
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: घरगुती औद्योगिक सांडपाणी विना प्रक्रिया उल्हास नदीत सोडले जात असल्याने उल्हास नदीचे पात्र प्रदूषित होत आहे. त्याचबरोबर उल्हास नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे. जलपर्णी काढण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सुरू आहे. दरम्यान उल्हास नदीपात्रात दोन नाल्यांमधून पाणी सोडले जात असल्याने नदी दूषित होत असल्याचे समोर आल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या उल्हास नदी पात्रात अनेक नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातील घातक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे. यामुळे नदी पात्र प्रदूषित होत आहे. प्रदुषणाचा धोका वाढत असल्याने तसेच नदी पात्राला जलपर्णीचा विळखा घट्ट होत असल्याने याविरोधात मी कल्याणकर संस्थेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नदीपात्र स्वच्छतेसाठी थेट १० दिवस नदीपात्रात आंदोलन छेडत सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारला होता.  

Kalyan News
Navi Mumbai: स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय, छापा टाकताच ग्राहकांसोबत महिला आक्षेपार्ह स्थितीत; ६ महिलांची सुटका

स्वच्छतेबाबत परिपूर्ण अहवाल करणार तयार 

यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरु केले आहे. मागील काही दिवसात नदी पात्रातील जलपर्णी काही प्रमाणात काढण्यात यश आले आहे. दरम्यान कल्याण- डोंबिवली महापालिकेसह इतर नगरपालिकाकडून नदीपात्रात सोडले जाणारे घातक सांडपाण्याचे स्त्रोत शोधण्याबाबतची कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सुरू आहे. यानंतर उल्हास नदी स्वच्छतेबाबत परिपूर्ण प्रकल्प अहवाल तयार केला जाणार असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता जयवंत हजारे यांनी सांगितले.

Kalyan News
Yavatmal Crime : यवतमाळमध्ये खळबळ; एकाची दगडाने ठेचून हत्या, चोवीस तासात दुसरी घटना

सांडपाणी नदीत सोडल्याने नोटीस 

तसेच नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबाबत महापालिकांकडून कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत किंवा केल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती त्यांच्याकडून घेऊन या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. दरम्यान जलपर्णी काढण्याचे काम मागील सात दिवसांपासून सुरू असून नदीपात्रातील जलपर्णी पूर्णपणे काढली जाईल. तसेच घरगुती सांडपाणी नदीपात्रात सोडल्याबाबत महापालिकेला कारणे दाखवा नोटीस दिल्याचेही हजारे यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com