Nigeria School Fire saam tv
देश विदेश

Nigeria School Fire : शाळेला लागलेल्या भीषण आगीत १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू; घटनेने सर्वच हळहळले

Nigeria School Fire News : शाळेला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू घडली आहे. शाळेत लागलेल्या आगीने घटनेने सर्वच हळहळले आहेत.

Vishal Gangurde

नायजेरियाच्या शाळेत भीषण दुर्घटना घडली आहे. नायजेरियातील एका शाळेत लागलेल्या आगीत १७ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. नायजेरियात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. ही आग नेमकी कशी लागली, याचा तपास सुरु करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, नायजेरियाच्या शाळेत आग लागली, त्यावेळी शाळेत एकूण १०० विद्यार्थी होते. या घटनेत १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शाळेल्या लागलेल्या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आग लागल्यानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले.

नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनी पीडितांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केली आहे. त्यांनी शाळेतील जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. मागील महिन्यात देखील नायजेरियाची राजधानी अबुजा भागात एका शाळेला आग लागली होती. शाळेल्या लागलेल्या भीषण आगीत दोघांचा मृत्यू झाला होता.

नेमकं कशामुळे घडली घटना?

शाळेत नेमकी कशी आग लागली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नसल्याचं एजन्सीने म्हटलं आहे. मिळालेल्या प्राथमिक निष्कर्षावरून दिसून आले की, शाळेजवळ काही काठ्या ठेवण्यात आल्या होत्या. या काठ्यांना स्थानिक भाषेत 'कारा' म्हटलं जातं. याच काठ्यांमुळे आग लागल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनी पीडित कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्याचे आवाहनही त्यांनी केलं.

बुर्किना फासो-नायजर सीमेजवळील हल्ल्यात १० जणांचा मृत्यू

दरम्यान, नायजर आणि बुर्किना फासो सीमेजवळ झालेल्या हल्ल्यात नायजरच्या दहा सैनिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नायजरच्या सैन्य दलाने गुरुवारी ही माहिती दिली. नायजरच्या सैन्याने म्हटलं की, 'एका युनिटला ताखजात गावातील मवेशियांमध्ये चोरट्यांना पकडण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. याच चोरट्यांनी केल्या हल्ल्यात १० सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: पैशाच्या समस्या कमी होतील, ५ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

SCROLL FOR NEXT