Nigeria News Saam tv
देश विदेश

Nigeria News: लग्न सोहळ्यावरुन परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; महिला-मुलांसह 100 जणांचा बुडून मृत्यू

100 Wedding Guests Dead: आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाल्याचे समजले असून मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

Boat capsizes in Nigeria: नायजेरिया येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर नायजेरियातील एका लग्न सोहळ्याला गेलेल्या नागरिकांची बोट नदीत उलटली आहे. या दुर्घटनेत जवळपास १०० व्यक्तींचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. तसेच अनेक व्यक्ती बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. (Latest Nigeria News)

स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. नायजर जवळच्या क्वारा राज्य येथे एक नायजर नदी आहे. ही नदी ओलांडून काही नागरिक लग्नाला निघाले होते. मात्र हा लग्नसोहळा त्यांच्या जीवावर बेतला आहे. आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाल्याचे समजले असून मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

नायजर राज्यातील एगबोटी गावात हा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. नदीपल्याड गाव असल्यानं वऱ्हाडी बोटीतून लग्नाला आहे. थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर जेवणाचा लाभ घेऊन पाहूने मंडळी पुन्हा बोटीतून आपल्या घराच्या दिशेने निघाली. घर गाठेपर्यंत अंधार झाला होता. अशात ती बोट पाण्यात उलटी झाली.

नायजेरियातील (Nigeria) नायजर ही सर्वात मोठी नदी (River) आहे. या नदीतूनच अनेक नागरिक प्रवास करतात. पावसाळ्यात नदीचा प्रवाह जास्ता असतो. मात्र येथे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती उपययोजना नसल्याने वाहून जाण्याच्या अनेक घटना घडत असतात, असं स्थानिक नागरिकांनी म्हटलं आहे. या दुर्घटनेत बचाव कार्य सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही? कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच, पाच जणांना घेतला चावा

Hruta Durgule: ‘आली मोठी शहाणी’च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा ! हृता दुर्गुळे - सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र

Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघातात मोठी कारवाई, २ इंजिनिअर आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Garlic Chutney: वरण भातासोबत पापड नको, फक्त ५ मिनिटांत तयार करा झणझणीत लसूण आणि पुदिना चटणी

SCROLL FOR NEXT