Dawood Ibrahim Most Wanted List NIA
Dawood Ibrahim Most Wanted List NIA NIA India
देश विदेश

Dawood Ibrahim : एनआयएकडून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर मोठं बक्षीस जाहीर

सुरज सावंत

मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने अडंरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्यावर २५ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये असलेल्या दाऊदची माहिती देणाऱ्या व्यक्तीला एनआयएकडून २५ लाख रुपयांचं रोख बक्षीस देण्यात येणार आहे. यासोबतच दाऊच्या डी गॅंग म्हणजेच डी कंपनीमधील सदस्य छोटा शकीलवर २० लाख रुपये तसेय अनिस, चिकना आणि मेननवर प्रत्येकी १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह त्याच्या इतर टोळीच्या सदस्यांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्याची एनआयएकडून चौकशी केली जात आहे. (NIA announces ₹25 lakh reward on Dawood Ibrahim)

हे देखील पाहा -

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, डी गॅंगने भारतात तस्करी करण्यासाठी एक युनिट स्थापन केली आहे. शस्त्रे, स्फोटके, ड्रग्ज आणि बनावट भारतीय चलनी नोटा (FICN) आणि पाकिस्तानी एजन्सी आणि दहशतवादी संघटनांशी जवळीक साधून दहशतवादी हल्ले करतात, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, एनआयए एजन्सीने दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम उर्फ ​​हाजी अनीससाठी बक्षिसे जाहीर केली आहेत. तसेच त्याचे जवळचे सहकारी जावेद पटेल उर्फ ​​जावेद चिकना, शकील शेख उर्फ ​​छोटा शकील आणि इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन उर्फ ​​टायगर मेमन यांच्यावर बक्षीस जाहीर करण्यात आली आहेत.

पाकिस्तानातील कराची येथे राहणारा दाऊद हा १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांसह भारतात अनेक दहशतवादी कारवायांसाठी वाँटेड आहे. त्याच्या डोक्यावर २००२ मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने $25 दशलक्षचे बक्षीस जाहीर केले आहे. तो भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यापैकी एक आहे. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मद (जेएम) प्रमुख मौलाना मसूद अझहर, हिजबुल मुजाहिदीनचा संस्थापक सय्यद सलाहुद्दीन आणि त्याचा जवळचा सहकारी अब्दुल रौफ असगर हे देखील मोस्ट वॉन्टेड आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील ९० टक्के होर्डिंग धोकादायक; मनपाने दिलेल्या नोटीसला एजन्सीचा ठेंगा

White Hair Solution : कोळशासारखे काळेभोर केस हवेत? 'या'टीप्स फॉलो करा

Maharashtra Politics : चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; तब्बल सव्वा तासांच्या भेटीत काय चर्चा झाली?

Women Health: महिलांनी निरोगी राहण्यासाठी काय काळजी घ्यावी?

Nandurbar News : नंदुरबारला वादळी तडाखा; नर्मदा काठावरील शाळेचे उडाले पत्रे, घरांचीही पडझड 

SCROLL FOR NEXT