Maharashtra Politics : चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; तब्बल सव्वा तासांच्या भेटीत काय चर्चा झाली?

Maharashtra Political News : चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दोघांच्या सव्वा तासांच्या भेटीत लोकसभा निवडणुकीसाठीच्या महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; तब्बल सव्वा तासांच्या भेटीत काय चर्चा झाली?
Maharashtra Politics :Saam tv
Published On

गणेश कवडे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचवा टप्प्यासाठी प्रचारसभा सुरु झाल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी सभा, रोड शो, बैठकांचा धडाका लावला आहे. या पाचव्या टप्प्यात मुंबईचाही समावेश आहे. मुंबईतील मराठी मते वळविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सुरु केले आहेत. भाजपनेही या मतांसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दोघांच्या सव्वा तासांच्या भेटीत लोकसभा निवडणुकीसाठीच्या महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील मराठी मतांचा टक्का वाढविण्याासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत मुंबई, ठाण्यातील मराठी मतांचा टक्का कशा पद्धतीने वळवता येईल, यावर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; तब्बल सव्वा तासांच्या भेटीत काय चर्चा झाली?
PM Modi Roadshow in Ghatkopar: PM मोदींचा मुंबईत रोड शो, ड्रोन- पंतग आणि फुगे उडवण्यास बंदी

तसेच मुंबई, ठाणे, नाशिक या भागांमध्ये असणारे मनसेचे मतदार कशा पद्धतीने वळवली जातील, तसेच १७ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा शिवाजी पार्क या ठिकाणी पार पडणार आहे. या सभेसाठी देखील राज ठाकरेंना निमंत्रण देण्यात आले आहेत. शेवटच्या दिवशी देखील राज ठाकरे यांनी मुंबईत प्रचार करावा, यासंदर्भात चर्चा झाली.

भेटीनंतर बावनकुळे काय म्हणाले?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. बावनकुळे म्हणाले, 'पंतप्रधान मोदी यांच्या १७ मे रोजी होणाऱ्या सभेला राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यासाठी आलो होतो. पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीत राज ठाकरेंचा महत्वाचा वाटा आहे. मुंबई आणि नाशिकमध्ये त्यांची भूमिका महत्वाची आहे. मोदींच्या सभेसाठी निमंत्रण देणे आमचे कर्तव्य आहे. १७ तारखेच्या सभाव्यतिरिक्त मुंबईत सभा घेण्याची विनंती केली आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com