National Highway Toll Naka Washroom News  AI Image
देश विदेश

प्रवाशांचे टेन्शन झालं दूर! टोल नाक्यांवर मिळणार स्वच्छ टॉयलेट अन् पार्किंग सुविधा, NHAI कडून मार्गदर्शक सूचना जारी

National Toll Plaza New Rules : राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी. प्रवाशांसाठी स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही, सॅनिटरी नॅपकिन मशीन, दिव्यांगांसाठी सुविधा आणि EV चार्जिंगसाठी सुविधा सुरु होणार.

Alisha Khedekar

  • राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी.

  • टोल नाक्यांवरील स्वच्छतागृहांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती केली जाणार

  • आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही आणि सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणाऱ्या यंत्रणा उभारल्या जाणार

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित व्हावा, यासाठी NHAI ने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. टोल नाक्यांवरील सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि पार्किंगच्या जागा अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

मार्गदर्शक सूचनांनुसार, टोल नाक्यांवरील सध्याच्या स्वच्छतागृहांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार फरशी, नळ, पाण्याची व्यवस्था, लाईट, सांडपाणी वाहून नेणाऱ्या यंत्रणेत सुधारणा केली जाईल. स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई करण्यासाठी कर्मचारी नेमले जातील. प्रवाशांची संख्या आणि सुविधांचा आकार लक्षात घेऊन स्वच्छतेचे वेळापत्रक ठरवले जाईल.

महिला प्रवासी, लहान मुले आणि कुटुंबांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाय केले जाणार आहेत. आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणाऱ्या यंत्रणाही उभारल्या जातील. तसेच, स्वच्छतागृहांची माहिती देणारे फलक लावले जातील. दिव्यांग प्रवाशांना सहज वापरता येईल, असे किमान एक स्वच्छतागृह प्रत्येक टोल नाक्यावर उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे.

पार्किंगच्या ठिकाणी वाहनांसाठी स्वतंत्र जागा, पाण्याचा योग्य निचरा आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उभारण्याची तरतूदही करण्यात आली आहे. स्वच्छतागृहांची स्थिती तपासण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पाण्याची कमतरता, दुर्गंधी, सांडपाण्याची पातळी, गळती आणि वीजपुरवठ्यातील अडचणी यांची माहिती त्वरित मिळेल. हा तपशील एनएचएआयच्या डिजिटल यंत्रणेशी जोडला जाईल. त्यामुळे संबंधित अधिकारी एका डॅशबोर्डवरून सुविधांची स्थिती आणि देखभालीवर लक्ष ठेवू शकतील.

प्रवाशांनाही स्वच्छतागृहांवरील क्यूआर कोड किंवा टचस्क्रीनच्या मदतीने आपले मत आणि तक्रारी नोंदवता येतील. यामुळे समस्यांवर लवकर उपाय करणे शक्य होईल. याशिवाय, सेप्टिक टाक्या आणि सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छता यंत्रांच्या मदतीनेच करावी लागेल. या कामासाठी माणसांकडून थेट टाक्यांमध्ये उतरून स्वच्छता करण्यास मनाई असेल. स्वच्छतेची रोज तपासणी केले जाईल. नियमांचे पालन न करणाऱ्या संबंधित संस्थांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. या उपक्रमामुळे महामार्गावरील प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सोयीस्कर सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fatty liver warning signs: सतत थकवा आणि पोट जड वाटतंय? पुरुषांमध्ये फॅटी लिव्हरची दिसून येतात ही 5 गंभीर लक्षणं

Bigg Boss 20 मध्ये शॉकिंग एविक्शन! घराबाहेर जाणार 'हा' सदस्य, नाव वाचून बसेल ४४० व्होल्टचा धक्का

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, रणदीप मलिक मास्टरमाइंड असल्याचा तपास यंत्रणांना संशय

Pune News: पुणे हादरले! अल्पवयीन मुलीवर चुलत भावांकडून बलात्कार, पीडिता गरोदर राहिल्याने संतापजनक घटना उघड

Pimpri-Chinchwad : रविवारची सुट्टी बनवा खास! पिंपरी-चिंचवडजवळील 'ही' ७ सुंदर ऐतिहासिक ठिकाणे फिरा

SCROLL FOR NEXT