Air India
Air India canva
देश विदेश

Air India News: धक्कादायक! चालू विमानामध्ये पतीने पत्नीचा गळाच आवळला; एयर इंडियाच्या विमानातील थरार

Gangappa Pujari

Air India Flight Viral News: विमान प्रवासासंदर्भातल्या अनेक घटना सध्या एकामागून एक चर्चेत आहेत. कधी विमानातील मारहाणीमुळे तर कधी असभ्य वर्तनामुळे विमान कंपन्या वादात सापडताना दिसत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका प्रवाशाने पत्नीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे...

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील नेवार्कहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) विमानात गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. प्रवासादरम्यान एका प्रवाशाला पॅनीक अटॅक आला, ज्यानंतर त्या प्रवाशाने चांगलाच गोंधळ घातला. धक्कादायक बाब म्हणजे या प्रवाशाने पत्नीचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. मात्र, क्रू मेंबर्सनी यामध्ये मध्यस्थी करत तरुणीची सुटका केली.

बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या मुंबईतील एका व्यावसायिकाने नेवार्कहून विमानाने उड्डाण केल्यानंतर विमानात गोंधळ सुरू केला. प्रवाशाने आरडाओरड करत फ्लाइट टेक ऑफ करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. जेव्हा क्रू मेंबर्स आणि त्यांच्या पत्नीने त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने चक्क पत्नीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)

यावर क्रू मेंबर्सनी फ्लाईटमध्ये उपस्थित डॉक्टरांच्या मदतीने प्रवाशावर जबरदस्ती केली आणि त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. यानंतर विमान वेळेवर मुंबई विमानतळावर उतरले. याबाबत त्याच्या पत्नीने पतीला पॅनीक अटॅक येत होते आणि गेल्या काही दिवसांपासून तो त्याची औषधेही घेत नसल्याचे सांगितले आहे.

प्रवीण टोनेस्कर या फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाने ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. त्यामध्ये त्याने विमानातील क्रू मेंबर्सचे कौतुक केले आहे. (Viral News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना नोटीस

Uddhav Thackeray: इंडिया आघाडी सत्तेत आल्यास तुम्ही पंतप्रधान बनणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आमचं ठरलंय की...'

Chess Playing Benefits: बुद्धिबळ खेळण्याचे जाणून 'घ्या' फायदे

अमरावती : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पांढरा कांदा झाला काळा; चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक नुकसान

Manoj jarange Patil: 'दिलेला त्रास विसरु नका, मतांमधून ताकद दाखवा', जरांगे पाटलांचे आवाहन; विधानसभेबाबत केली मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT