Aryan Khan Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेंची मुंबई हायकोर्टात धाव, रीट याचिका केली दाखल

Mumbai High Court : समीर वानखेडेंची (Sameer Wankhede) मागणी हायकोर्टाकडून मान्य झाली असून आजच याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
sameer wankhede and aryan khan
sameer wankhede and aryan khanSaam Tv
Published On

सचिन गाड, मुंबई

Sameer Wankhede: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी (Aryan Khan Drug Case) आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai Highcourt) धाव घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी रिट पिटीशन दाखल केली आहे. व्हॅकेशन कोर्टात त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. यामध्ये न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती अरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणीची मागणी केली आहे. समीर वानखेडेंची (Sameer Wankhede) मागणी हायकोर्टाकडून मान्य झाली असून आजच याप्रकरणी सुनावणी होणार आहे. विधिज्ञ रिझवान मर्चंट, आबाद पोंडा समीर वानखेडे यांची बाजू मांडणार आहेत.

sameer wankhede and aryan khan
Aryan Khan Case: मुंबईत 4 फ्लॅट, महागडी घड्याळ, परदेश प्रवास... आर्यनला पकडणाऱ्या समीर वानखेडेंच्या लक्झरी लाइफचा खुलासा

समीर वानखेडे यांनी गोव्याला जाणाऱ्या कोर्डीलिया क्रूझवर छापा टाकत ड्रग प्रकरणात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. याप्रकरणी आर्यन खानला तुरुंगात जावे लागले होते. याप्रकरणी त्याची सुटका देखील झाली आहे. पण आता हे प्रकरण तब्बल 19 महिन्यांनंतर पुन्हा चर्चेत आले आहे. समीर वानखेडे आणि इतर काही जणांनी मिळून आर्यन खानकडे 25 कोटींची मागणी केल्याचा आरोप आहे.

आता भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. सीबीआयने वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. याप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे यांच्या गोरेगाव येथील घरावर छापा देखील टाकला होता. तसंच सीबीआयने समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे मोबाईल जप्त केले आहेत.

sameer wankhede and aryan khan
Ambernath Crime: परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; 5 जणांना ठोकल्या बेड्या

दरम्यान, समीर वानखेडे यांनी सीबीआयच्या समन्सविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. पण दिल्ली हायकोर्टाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. दिल्ली हायकोर्टात गुरुवारी सीबीआयने आम्ही कोणालाही अटक करत नसल्याचे सांगितले होते. वानखेडे यांना हवे असते तर त्यांनी वेळ मागितला असता, मात्र त्यांना दिल्ली हायकोर्टात येण्याचा अधिकार नाही, असे कोर्टाने सांगितले होते. यावेळी दिल्ली हायकोर्टाने त्यांना 'तुम्ही मुंबई हायकोर्टात जाऊ शकता.', असा सल्ला दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com