Man for Harassing Female Tourist on Road Saam
देश विदेश

पर्यटक तरूणीकडे आधी शरीरसंबंधाची मागणी, भररस्त्यावर हस्तमैथून; पीडितेनं VIDEO शूट करून व्हायरल केला, नेमकं घडलं काय?

Man for Harassing Female Tourist on Road: श्रीलंकेत न्यूझीलंडच्या एका महिला पर्यटक तरूणीला अश्लील हावभाव आणि छळाचा सामना करावा लागला. महिलेनं हा संपूर्ण प्रकार व्हिडिओत कैद केला. तसेच व्हायरल केला.

Bhagyashree Kamble

'अतिथी देवो भव', याचा अर्थ म्हणजे पाहुण्यांना देवाप्रमाणेच सन्मान आणि आदराने वागवावे. परंतु, काही ठिकाणी पाहुण्यांसोबत छळ केला जातो. काहींना अश्लील छळाचा सामना करावा लागतो. असाच एक प्रकार श्रीलंकेतून समोर येत आहे. न्यूझीलंडच्या एका पर्यटक महिलेला श्रीलंकेमध्ये छळ आणि अश्लील हावभावाचा सामना करावा लागला आहे. पीडित महिलेनं या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियात व्हायरल केला आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच स्थानिक पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेतली. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी २३ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला गेल्या अनेक दिवसांपासून श्रीलंकेत ऑटो रिक्षाने फिरत होती. एके दिवशी श्रीलंकेतील एका तरूणानं दुचाकीवरून तिचा पाठलाग केला.

तरूणानं तिला थांबवलं. तसेच तिच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. हा तरूण फक्त पाठलाग करत नव्हता, तर तिच्याकडे लैंगिक संबंधाची मागणी देखील करत होता. नंतर हस्तमैथून करत असल्याचं व्हिडिओतून समोर आलं आहे. तिनं या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियात शेअर केला आहे. तरूणीनं व्हिडिओ शेअर करून आपली व्यथा मांडली आहे.

'एक माणूस माझ्या पुढे स्कूटरवरून जात होता. त्यानं नंतर माझ्या ऑटो रिक्षेचा पाठलाग केला. त्यानं पुढे जाऊन मला थांबवलं. सुरूवातीला मी त्याला दुर्लक्षित केलं. त्याचं वागणं मला चुकीचं वाटत होतं. मी त्याच्यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला', असं तरूणी म्हणाली. 'मी काही वेळानंतर पाणी पिण्यासाठी ऑटो रिक्षा थांबवली. तो पुन्हा आला. तो माझ्यासोबत थोडा वेळ बोलला. त्यानं कुठे राहतेस असा प्रश्न विचारला. नंतर थेट शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली'.

'तो तरूण नंतर माझ्यासमोर अश्लील कृत्य करू लागला. हस्तमैथून करू लागला. हा सर्व प्रकार मी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं. मी नंतर तेथून निघून गेली. संपूर्ण प्रवासात मला असुरक्षित वाटलं', असं महिलेनं सांगितलं. दरम्यान, पीडित तरूणीनं महिलेनं स्पष्ट केलं की, 'ही केवळ एका व्यक्तीची कृती होती. संपूर्ण देशाचे प्रतिबिंब नाही', असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजितदादांचा अपघात की घातपात? रोहित पवारांची पत्रकार परिषद सुरु

Career Tips : करिअरमध्ये यश मिळवायचेय? मग वाचा या टिप्स

Shocking : १४ फेब्रुवारीची ती रात्र, आई वडील चक्क ४ वर्षाच्या बाळाला कॅबमध्ये विसरले अन्...

Gold Rate Today: सोन्याचे दर आज वाढले की घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Rohit Sharma : रोहित शर्माचा मराठमोळा ठसका, हास्यजत्रेच्या टीमसोबत मारल्या गप्पा| VIDEO

SCROLL FOR NEXT