Earthquake
Earthquake  saam TV
देश विदेश

Earthquake In New Zealand : तुर्कीनंतर आणखी एक देश भूंकपाने हादरला; न्यूझीलंडमध्ये ६.१ तीव्रतेचा भूकंप

Vishal Gangurde

Earthquake In New Zealand : तुर्कस्तान आणि सिरिया देशात चाळीस हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तुर्कस्तान आणि सीरिया भूकंपामुळे मोठ्या संकटातून जात आहे. याचदरम्यान, तुर्कस्तान आणि सीरियानंतर न्यूझीलंड देश भूकंपाने हादरला आहे. न्यूझीलंडमध्ये बुधवारी दुपारी ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप होता.

न्यूझीलंडच्या उत्तर पश्चिम भागात भूकंपाचे (Earthquake) झटके बसले आहे. न्यूझीलंडमध्ये आठवड्याभरापासून वादळ धडकलं आहे. वादळामुळे अनेक शहरात पाऊस आणि पूर आला आहे. यामुळे न्यूझीलंड सरकारने आणीबाणी जाहीर केली आहे. न्यूझीलंड सरकारने देशाच्या ६ क्षेत्रात आणीबाणी लागू केली आहे.

न्यूझीलंडमध्ये (New zealand) समुद्र किनाऱ्याजवळ मोठंमोठ्या लाटा उसळत आहे. तसेच काही ठिकाणी जोरदार पाससाच्या सरी कोसळत आहे. यामुळे काही भागात भूस्खलनचा धोका निर्माण झाला आहे. या पूरामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे.

न्यूझीलंड सरकारकडून आणीबाणीची घोषणा

न्यूझीलंड सरकारने परिपत्रक जारी करत मंगळवारी राष्ट्रीय आणीबीणीची घोषणा केली आहे. देशातील सहा भागात आणीबाणी लागू केली आहे. या भागामध्ये नॉर्थलँड, ऑकलँड, ताइराविटी, बे ऑफ प्लेंटी वाइकाटो आणि हॉक्स या शहरांचा सामावेश आहे.

न्युझीलंडमधील मंत्री कीरन मॅकअनल्टी यांनी सांगितले की, वादळामुळे देशावर मोठा परिणाम झाला आहे. देशातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वादळामुळे अनेकांच्या घरातील वीज नाही. त्यामुळे अंधारातच घरात राहावं लागत आहे'.

तुर्कस्तानमध्ये मृतांची संख्या ४० हजार पार

दरम्यान, तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या सलग भूकंपानंतर देशात चाळीस हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भूकंपामुळे अनेक इमारती भुईसपाट झाल्या आहेत. भूकंपामुळे अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avinash Jadhav: मतांसाठी मराठी आणि गुजरातीचा वाद निर्माण केला; मनसेची ठाकरे गटावर टीका

Maharashatra Election: निवडणूक तोंडावर,ठाकरेंचा शिलेदार तडीपार; सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस

Maharashtra Election: महायुतीत दादाविरुद्ध दादा संघर्ष कायम; चंद्रकांत पाटलांकडून पवारांना संपवण्याची भाषा

Maharashtra Politics 2024 : कोल्हापूरच्या विजयासाठी लाखांच्या पैजा; वाढलेल्या टक्क्यानं वाढवली उत्सुकता

PBKS vs RCB: 'विराट' वादळानं RCB चा विजयी चौकार; पंजाब प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; या संघांचं टेन्शन वाढलं

SCROLL FOR NEXT