देश विदेश

Switzerland Resort: नवीन वर्षाच्या जल्लोषादरम्यान रिसॉर्टमध्ये दहशतवादी हल्ला? पोलिसांचा धक्कादायक खुलासा; स्फोटात ४० जणांचा मृत्यू, थरारक Video व्हायरल

Switzerland Resort Explosion : स्वित्झर्लंडमध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन दरम्यान एक दुःखद घटना घडलीय. क्रॅन्स मोंटाना येथील एका लक्झरी स्की रिसॉर्ट बारमध्ये झालेल्या स्फोटात ४० जणांचा मृत्यू झाला आहे.

Bharat Jadhav

  • नवीन वर्षाच्या जल्लोषाला गालबोट

  • स्वित्झर्लंडमधील स्की रिसॉर्टमध्ये भीषण स्फोट

  • ४० जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

स्वित्झर्लंडमध्ये गुरुवारी नवीन वर्षाच्या जल्लोषावे एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका स्की रिसॉर्टमध्ये स्फोट झाला असून त्यात ४० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रेस मोंटानामधली एका लक्झरी अल्पाइन स्की रिसॉर्ट बारमध्ये स्फोट झाला. यात ४० जणांचा बळी गेलाय. तर १०० हून अधिकजण जखमी झाले. या घटनेनंतर हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर पोलिसांनी मोठा खुलासा केलाय.

स्वित्झर्लंडमधील अल्पाइन स्की रिसॉर्ट बारमध्ये स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप समोर आले नाहीये. यात अनेक लोक मृत्युमुखी पडलेत." पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या ले कॉन्स्टेलेशन नावाच्या बारमध्ये पहाटे १:३० च्या सुमारास स्फोट झाला. येथे अनेकजण नवीन वर्षाचा दिवस साजरा करण्यासाठी आले होते, अशी माहिती दक्षिण-पश्चिम स्वित्झर्लंडच्या वालिस कॅटनमधील एका पोलीस प्रवक्ते गॅटन लॅथियम यांनी एएफयी यांनी दिली.

स्विस माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये एका इमारतीला आग लागल्याचे दिसतंय. तसेच जवळच अनेक आपत्कालीन वाहने असतात. दरम्यान बारमध्ये स्फोट झाल्यानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्काय न्यूजने पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, या घटनेत किमान १० जणांचा मृत्यू झालाय. तर काही स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे की हा आकडा खूप जास्त असू शकतो. परंतु पोलीस प्रवक्त्याने मृतांच्या संख्येची पुष्टी करण्यास नकार दिलाय. अनेक जण भाजलेल्या जखमांवर उपचार घेत असल्याचे वृत्त आहे.

स्वित्झर्लंडमधील बारमध्ये दहशतवादी हल्ला?

स्विस पोलिसांनी सांगितलं की, प्राथमिक तपासानुसार हा कोणत्याच प्रकारे दहशतवादी हल्ला असल्याचं निष्पन्न झालं नाहीये. बारमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागली होती. सध्या तरी कोणत्याही दहशतवादी कट असल्याचं दिसत नाहीये.'' मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा १:३० वाजता 'ले कॉन्स्टेलेशन बार अँड लाउंज' नावाच्या बारमध्ये मोठ्या संख्येने लोक नवीन वर्ष साजरा करत होते, त्यावेळी बारमध्ये आग लागली, अशी माहिती पोलीस प्रवक्त्यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपसोबत दुरावा, पवारांशी घरोबा? पुण्यात शिंदेसेनेसोबत दोन्ही राष्ट्रवादीची युती?

ऐन महापालिका निवडणुकीत काँग्रेसने भाकरी फिरवली; राजकारणात दिला सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

Maharashtra Live News Update: ठाणे महानगरपालिका निवडणूक: वैध ठरलेल्या 918 उमेदवारांपैकी आजपर्यत 27 उमेदवारांनी घेतली माघार

निवडणूक कार्यालयात धक्कादायक प्रकार; उमेदवारानं थेट विरोधकाचा AB फॉर्म फाडून गिळला

राजकारण कराल तर सरकारी नोकरी गमवाल? राजकीय स्टेटस, कमेंट्स करणं पडेल महागात?

SCROLL FOR NEXT