Corona Saam Tv
देश विदेश

मोठी बातमी! कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची भारतात एन्ट्री; तज्ज्ञांनी दिला इशारा

वृत्तसंस्था

Corona News Variant: भारतात कोरोनाचा (Corona) आलेख झपाट्याने घसरत आहे. केरळ वगळता बहुतेक राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. पण या सगळ्यात शेजारील चीनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटमुळे भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. नुकताच ओमायक्रॉनच्या आणखी एका व्हेरिअंटने भारतात एन्ट्री केली आहे. (Corona News Variant Latest Update)

Omicron BF.7 या नवीन प्रकाराचा पहिला रुग्णही भारतात सापडला आहे. नवीन Omicron प्रकार देखील खूप संसर्गजन्य असल्याचे मानले जाते. यात चिंतेची बाब म्हणजे अधिक हा नवीन व्हेरिअंट लोकांमध्ये वेगाने पसरत आहे. या व्हेरिअंटला XBB असे नाव देण्यात आले आहे. हिवाळ्यामध्ये हे प्रमाण वाढू शकते असा इशारा काही तज्ज्ञांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतातील अनेक राज्यांमध्ये या नव्या व्हेरिअंटचे रुग्ण आढळून आले आहेत. यात ओडिशा, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.

XBB व्हेरिअंटचे रुग्ण याआधी युरोप आणि अमेरिकेतही सापडले आहेत. भारतात देखील नव्या या नवीन व्हेरिअंटची 50 हून अधिक लोकांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सिंगापूरमध्ये देखील या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत सावध राहण्याची गरज आहे, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

'ही' आहेत लक्षणे?

-ताप

-गळ्यात खरखर वाटणे

- थंडीच्या दिवसांत विशेष काळजी घेणे आवश्यक

भारतात 26 हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणे

दरम्यान, देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या 26,834 आहे. जी देशातील एकूण सकारात्मक प्रकरणांच्या 0.06 टक्के आहे. भारताचा दैनंदिन सकारात्मकता दर 1.86 टक्के असल्याचे नोंदवले गेले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत एकूण 2,060 नवीन कोविड प्रकरणे आढळून आली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT