बीड - शेतकरी (Farmer) महिलेने दिवसभर कापूस वेचला पण वेचलेला कापूसही भिजला. आता घर कुटुंब चालवायचं कस? या विवचणेतून महिला शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी खळबळजनक घटना, बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यातील नंदपूर कांबी येथे घडली आहे. परतीच्या पावसाने सोयाबीन गेलं, कापसाच्या वाती झाल्या त्यामूळे हतबल झालेले बीड जिल्ह्यातील शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहे. (Beed Latest News)
सविता मुळे असं आत्महत्या केलेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे. मयत महिलेचे पती अपंग आहेत. दोन मुलांसह महिला घर चालवत होती, शेती करत होती. मात्र गेल्या आठवडा-भरापासून जिल्ह्यात प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले.
दोन ते तीन वेळा पाऊस आला. त्या दरम्यान शेतातला कापूस तर भिजलाच, वेचलेला कापूसही भिजला. आता वर्ष कसं घालवायचं ? या चिंतेत आणि नैराश्येतून या शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती तलवाडा पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी जावून पोलिसांनी पंचनामा केला आहे. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.