नवी दिल्ली- महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच कोरोनाच्या (Corona) नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्यासह देशात आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (New Variant Of Corona Deltacron)
अनेक देशात दररोज लाखो कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण आता ओमिक्रॉन वेरिएंटच्या लक्षणांसारखा आणखी एक नवा वेरियंट समोर आला आहे. त्या वेरिएंटचे नाव डेल्टाक्रॉन (Deltacron) असल्याची माहिती समोर आली आहे. या नवीन डेल्टाक्रॉन वेरिएंटचे सायप्रसमध्ये २५ रुग्ण आढळून आले आहेत.
हे देखील पहा -
या नवीन डेल्टाक्रॉन वेरिएंटबाबद सायप्रसच्या बायोटेक्नॉलॉजी अँड मॉलिक्रुयलर वायरोलॉजी विद्यीपठाच्या प्रयोगशाळेतील प्रमुख डॉक्टर लियोनडिओस कोस्रिकस यांनी माहिती दिली. सायप्रसमध्ये आढळून आलेल्या २५ रुग्णांपैकी ११ जणांना या वेरिएंटमुळं रु्गणालयात दाखल करण्यात आलं होत. तर, 14 जणांची प्रकृती स्थिर होती.
डेल्टाक्रॉनमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन आणि डेल्टा वेरियंटची लक्षण आढळूण आल्याची माहिती तज्ज्ञां कडून देण्यात येत आहे. दरम्यान, असे असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही संघटनेने डेल्टाक्रॉनला मंजुरी दिलेली नाही.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.