New rules for international arrivals in India Saam Tv
देश विदेश

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी 7 दिवस होम क्वारंटाईन अनिवार्य- केंद्र सरकार

देशातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांमध्ये परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना सात दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: देशातील कोरोनाच्या (Corona) वाढत्या संक्रमणावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांमध्ये परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना सात दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी, सात दिवसांच्या अलग ठेवण्याचे नियम केवळ ज्या देशात कोरोना (At Risk) जास्त पसरला आहे त्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी होते, परंतु आता (Non at risk) देशांतील प्रवाशांसाठीही सात दिवसांचे होम क्वारंटाईन (Home Quarantine) अनिवार्य करण्यात आले आहे. (New rules for international arrivals in India)

दोन्ही श्रेणीतील प्रवाशांना 'एअर सुविधा'वर आरटी पीसीआर निकाल अपलोड करावा लागेल. दरम्यान, ओमिक्रॉनच्या देशात प्रकरणे तीन हजारांच्या पुढे गेली आहेत. तर देशात रुग्णांची संख्या 1 लाख 17 हजारांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी मृत्यूची संख्याही 300 च्या पुढे गेली. अशा परिस्थितीत देशातील कोरोनाला (Corona) रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, हे आदेश 11 जानेवारी 2022 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे, अशी माहिती सरकारतर्फे (Central Government) जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलेली आहे.

दरम्यान, 1 डिसेंबरपासून परदेशातून भारतात येण्याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वात बदल करण्यात आला आहे. आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे 11 जानेवारीपासून नवीन जोखीम असलेल्या देशांमध्ये लागू होतील. (New quarantine rules for international passengers in india)

1 डिसेंबरपासून लागू झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 11 देशांना At risk मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. या देशांमध्ये यूके, युरोपमधील देश, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल यांचा समावेश होता.

हे देखील पहा-

आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आल्यावर आणखी 9 देशांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु पूर्वी समाविष्ट केलेला सिंगापूर हा धोका असलेल्या देशांच्या श्रेणीतून काढून टाकण्यात आला आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या देशांमध्ये घाना, टांझानिया, काँगो, इथिओपिया, कझाकिस्तान, केनिया, नायजेरिया, ट्युनिशिया आणि झांबिया यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : आष्टीत पोस्टल मतदानात दबावतंत्र; राम खाडे यांचा आरोप, निवडणूक विभागाकडे तक्रार

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT