new delhi railway  saam tv
देश विदेश

New Delhi Railway Station Stampede : मोठी बातमी! नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी, महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या १५ भाविकांचा मृत्यू

New Delhi Railway Station Stampede update : नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. महाकुंभमेळ्याला जाणारी ट्रेन पकडताना चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री चेंगराचेंगरी होऊन अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येने भाविक पोहोचले होते. त्यासाठी ट्रेन पकडताना उडालेल्या गोंधळानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर चेंगराचेंगरीची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रात्रीच्या ९ वाजून ५५ मिनिटाला ही चेंगराचेंगरीची घटना घडली. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत ३ लहान मुलांसहित १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एलएनजेपी रुग्णालयाचे मुख्य आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.

राजनाथ सिंह आणि दिल्लीचे एलजींनी व्यक्त केलं दु:ख

चेंगराचेंगरीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. पोलीस आणि आरपीएफचे जवानही पोहोचले आहेत. घटनेनंतर स्टेशन तातडीने रिकामे केलं आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरील भाविकांच्या मृत्यूवर पंतप्रधान मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री, दिल्लीचे उपराज्यपाल वीके सेक्सेना यांनी दु:ख व्यक्त केल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

नवी दिल्ली रेल्वे स्टेशन झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने व्यथित झालो आहे. प्रियजन गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. मी प्रार्थना करतो की, जखमी झालेले लोक लवकर बरा होवो. संकटकाळी मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामाप्रती नरेंद्र मोदी प्रभावित झाले, असे मोदींनी सांगितले.

Tragic stampede incident at New Delhi railway station

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT