IMD issues Cyclone alert — Heavy rain forecast for Maharashtra  Saam TV Marathi
देश विदेश

Cyclone Alert : पुन्हा आस्मानी संकट! 'मोंथा'नंतर आणखी एका चक्रीवादळाचं सावट, महाराष्ट्रावर होणार परिणाम, IMD चा गंभीर इशारा

New Cyclone Alert After ‘Monta’ : मोंथा चक्रीवादळानंतर पुन्हा आस्मानी संकट येण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. IMD ने महाराष्ट्र आणि अंदमान-निकोबारसह अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Namdeo Kumbhar

IMD new cyclone warning after Monta : मोंथा चक्रीवादळ परतल्यामुळे राज्यात पावसाने थोडीफार उसंत घेतली आहे. पावसाने उघडीप घेतल्यानंतर राज्यात थंडीला सुरूवात होईल, असा विचार करत असाल तर थांबा... हवामान विभागाकडून आणखी एका चक्रीवादळाचा इशारा (Cyclone Alert) देण्यात आला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांसाठी आयएमडीकडून चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. ४ नोव्हेंबरपासून हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांना पावसाचा इशारा (Bay of Bengal cyclone effect on Maharashtra) देण्यात आला आहे. राज्यात पुढील काही दिवस किनारी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Weather Update) शक्यता आहे. (Andaman Nicobar cyclone impact forecast)

बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी अंदमान आणि निकोबार बेटांसाठी 'चक्रीवादळाचा इशारा' जारी केलाय. आजपासून हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या म्यानमार किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास सुरुवात झाली. त्याचे रूपांतर चक्रि‍वादळात झालेय.

या चक्रीवादळाची व्याप्ती समुद्रसपाटीपासून ५.८ किमी पर्यंत पसरलेली आहे. पुढील ४८ तासांत हे चक्रवीदाळ म्यानमार-बांगलादेश किनाऱ्याच्या उत्तरेकडे आणि वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या चक्रीवादळामुळे भारतामध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या किनारी भागासह अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उत्तर अंदमान समुद्रावर ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. त्यातच या ठिकणी चक्रीवादळाची शक्यत आहे. आज ही प्रणाली अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रातील परिस्थिती खवळलेली राहणार आहे. किनाऱ्यावरील लोकांनी सतर्क राहावे, असे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, चक्रीवादळाच्या परिस्थितीमध्ये मच्छिमारांना उत्तर अंदमान समुद्राच्या काठावर आणि बाहेर समुद्रात जाऊ नये असा सल्ला स्थानिक प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

SCROLL FOR NEXT