Shraddha News Update Saam TV
देश विदेश

Shraddha News Update: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी नवीन अँगल; अंमली तस्कर पोलिसांच्या ताब्यात

अशात पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला सुरत येथून ताब्यात घेतले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shraddha News Update:श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी एक नवीन अँगल समोर आला आहे. अफताब अंमली पदार्थांचे सेवन करायचा असे श्रद्धाच्या मित्रांनी सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी या दिशेने तपासाला सुरूवात केली. अशात पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला सुरत येथून ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, गुजरात पोलिसांनी (Police) अंमली पदार्थ तस्कर फैजल मोमीन याला सुरतमध्ये अंमली पदार्थाच्या धक्क्यादरम्यान अटक केली. अफताबला अंमली पदार्थ पुरवणारा फैजल असावा असा पोलिसांना दाट संशय आहे. यात तपासादरम्यान समजले की, अफताब आणि फैसल या दोघांचे अनेक कॉमन मित्र आहेत. त्यामुळे अफताब आणि फैसल यांचा संपर्क झाला आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत. यासाठी पोलीस दोघांचेही कॉल डिटेल्स तपासत आहेत.

गुरूवारी दिल्लीतील रोहिणी येथे सकाळी ११.३० वाजता पॉलीग्राफ चाचणीला सुरूवात झाली. यात देखील काळीज पिळवटून टाकणारे अनेक खुलासे झाले आहेत. पॉलीग्राफ चाचणीवेळी अफताबचा रक्तदाब सर्वप्रथम तपासला गेला. त्यानंतर त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये त्याच्या बालपनापासून श्रध्दाबरोबर असलेल्या लिव्ह इन रिलेशनशीप विषयी विचारण्यात आले. त्याच्या आवडी, सवयी आणि मित्र परिवार अशा मुद्दयांवर प्रश्न विचारण्यात आले. यात आश्चर्यकारक बाब म्हणजे उत्तरं देत असताना तो ती इंग्रजी भाषेत देत होता. मात्र त्याला सर्व प्रश्न (Question) हिंदीमध्ये विचारण्यात आले होते.

प्लॅनिंग करून केली हत्या

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि अफताब हे दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यामुळे हे प्रकरण बाहेर आल्यावर अनेकांना वाटले की, त्याने राग अनावर झाल्याने एवढे घृणास्पद कृत्य केले असावे. मात्र तसे नसून त्याने पूर्वनियोजन करून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. श्रद्धाची हत्या करण्याआधी त्या दोघांनी एकत्र बॉलिवूडचा दृश्यम हा चित्रपट पाहिला होता.

जेव्हा त्याला श्रद्धाची हत्या रागत केली का? असे विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले चित्रपट संपल्यावर मी माझी नविन स्टोरी रचण्याचा प्रयत्न करत होतो. क्षद्धाला मारण्यासाठी अफताबने आधीच मोठे नियोजन केले होते. हत्येनंतर देखील तो स्वत: च्या बचावासाठी पुरावे नष्ट करत होता. यासाठी त्याने श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केल्यावर तिच्या घरच्यांना आणि स्वत : च्या घरच्यांना संपर्क केला होता. फोनवर बोलताना त्याने काहीही न घडल्याचा आव आणला. तसेच हत्येसाठी वापरलेले सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही त्याने केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT