AC rules in India saam tv
देश विदेश

AC rules : तुमच्या AC चा रिमोट कंट्रोल सरकारच्या हाती, सरकार आणणार नवे नियम

New AC rules : उकाड्याने हैराण नागरिकांचं आता टेन्शन वाढलंय...कारण तुमच्या एसीच्या रिमोटवर सरकारचं नियंत्रण असणार आहे. हे आम्ही का म्हणतोय? जाणून घेण्यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट

Nandkumar Joshi

भरत मोहोळकर, साम टीव्ही

government new guidelines to regulate the usage of air conditioners : उकाड्याने हैराण झाल्यानंतर एसीचा थंडावा प्रत्येकाला हवा असतो. मात्र आता तुमच्या एसीचं तापमान सरकार नियंत्रित करणार आहे. त्यासाठी सरकारने एअर कंडिशनिंगसाठी राष्ट्रीय मानक ठरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय उर्जा आणि शहर विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिलीय.

एकीकडे देशात कार्बनचं उत्सर्जनामुळे प्रदूषण वाढत आहे. तर दुसरीकडे उर्जेचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण होतोय. त्यामुळेच सरकारने एसीचं तापमान नियंत्रित करण्यासाठी धोरण आखण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र हे या धोरणात नेमकं काय असणार आहे? पाहूयात.

ठळक मुद्दे -

एसीच्या तापमान मर्यादेसंदर्भात नियम लागू करणार

एसीचे तापमान 20 ते 28 अंश सेल्सियस मर्यादेत ठेवावं लागणार

घर, ऑफिस आणि मॉलच्या सेंट्रल एसीलाही हा नियम लागू

विजेची बचत आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी निर्णय

2026 च्या उन्हाळ्यापूर्वी नियम लागू करणार

अनेक ऑफिसमध्ये एसीचं तापमान 16 ते 18 अंश सेल्सियसपर्यंत ठेवण्यात येतं....त्यामुळे उन्हाळ्यात 10-12 गिगावॅट इतका ताण पॉवर ग्रीडवर येतो... त्यामुळेच विविध देशांच्या एसी संबंधित धोरणांचा अभ्यास करुन एसीचं तापमान 20 ते 28 अंश सेल्सियस दरम्यान ठेवण्याचा नियम करण्यात येणार आहे... तर एसीचं तापमान 16 ते 20 दरम्यान ठेवणाऱ्यांना 20 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची सवय करुन घ्यावी लागणार, हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT