Nepal Bus Accident ANI
देश विदेश

Nepal Bus Accident : नेपाळच्या बस अपघातातील मृतांचा आकडा वाढला, मृतांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश

Nepal Bus Accident update : नेपाळमधील बस अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. या अपघातातील मृतांचा आकडा २७ वर पोहोचली आहे. यात महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : नेपाळमध्ये भीषण रस्ते अपघात झाला आहे. नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांची बस नदीत कोसळली आहे. उत्तर प्रदेशची ही बस पोखरा येथून काठमांडू येथे निघाली होती. या बसमध्ये ४० प्रवासी होते. यातील २७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका मुलाचाही समावेश आहे.

नेपाळमधील अपघातातील जखमींचा जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. नेपाळमधील तनहून जिल्ह्यात बस नदीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. जिल्हा पोलीस ऑफिस तनहूनचे डीएसपी दीपकुमार यांनी या घटनेची खात्री केली आहे.

डीएसपी दीपकुमार राया यांनी सांगितले की, 'उत्तर प्रदेशमधील बस ही पोखरा शहरातून काठमांडूला चालली होती. हिच बस नदीत कोसळली. नेपाळमधील हा अपघात सकाळी ११ वाजता झाला. रस्त्यावरील वाटाड्यांनी ही बस नदीत कोसळल्याचं पाहिलं. त्यानंतर ही माहिती त्यांनी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, सैन्य दल आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचले. तनहून जिल्ह्यात एसपी बीरेंद्र शाही देखील घटनास्थळी पोहोचले आहेत.

महाराष्ट्रातील ११० प्रवासी गेले होते नेपाळला

गोरखपूरचे डीएम कृष्णा करुणेश यांनी माहिती देताना म्हटलं की, 'गोरखपूरच्या केसरवानी टूर अँड ट्रॅवल्स एजन्सीची ही बस होती. महाराष्ट्रातील लोकांनीही या यात्रेसाठी बुक केलं होतं. २ बस बुक केल्या होत्या. त्यात १०० हून अधिक जण होते. ते उत्तर प्रदेशच्या प्रयागराज आणि अयोध्या येथून दर्शन घेऊन नेपाळकडे निघाले होते. दुसऱ्या बसमधील प्रवासी नेपाळच्या मुगलिंग येथे थांबले होते.

उत्तर प्रदेश सरकारमधील अधिकारी नवीन कुमार यांनी अपघातानंतर तातडीने नेपाळला संपर्क केला. नेपाळच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून रेस्क्यू ऑपरेशनची माहिती जाणून घेतली. महाराजगंजचे उपजिल्हा दंडाधिकारी - अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी नेपाळला पाठवण्याची तयारी सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT