Nepal Bus Accident
देश विदेश

Nepal Bus Accident: नेपाळमधील बस अपघातात महाराष्ट्रातील १६ जणांचा मृत्यू

Nepal Bus Accident: ४० भारतीय प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा नेपाळमध्ये भीषण अपघात झालाय.

Namdeo Kumbhar

Nepal Bus Accident: ४० भारतीय प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा नेपाळमध्ये भीषण अपघात झालाय. यामध्ये २० प्रवाशांचा मत्यू झालाय. मृतामध्ये महाराष्ट्रातील १६ जणांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील गोरखपूर नोंदणीकृत असलेली ही बस प्रवाशांना घेऊन नेपाळकडे निघाली होती. बसमध्ये ४० प्रवाशी होते. ही बस तनहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरातील मार्सयांगडी नदीत कोसळली.

बसमधे जळगाव आणि बीड मधील काही प्रवाशी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी कऱण्यात आला आहे. +977-9851107021

अपघाताच्या घटनेला नेपाळ पोलिसांनी दुजेरा दिला आहे. स्थानिक डीएसपी दीपकुमार राय यांनी सांगितले की, UP-53- FT 7623 क्रमांकाची बस नदीत कोसळली. गुरूवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये थांबलेल्या भारतीय प्रवाशांना घेऊन ही बस काठमांडुकडे निघाली होती. बसमध्ये सर्व ४० भारतीय प्रवासी प्रवास करत होते.

काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हेलिपॅडवरून वैद्यकीय पथकाला घेऊन नेपाळ लष्कराचे MI-17 हेलिकॉप्टर तनहुन जिल्ह्यातील घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती नेपाळ लष्कराकडून देण्यात आली आहे.

नेपाळच्या स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. अपघातस्थळी बचाव पथकाचं मदतकार्य सुरु आहे. एसएसपी माधव पौडेल यांच्या नेतृत्वात नेपाळचं सैन्य दल, सशस्त्र पोलीस दलाचे जवान घटनास्थळी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT