हा व्हिडिओ नीट पाहा...राहुल गांधींनी ज्ञानेश कुमारांविरोधात सुप्रीम कोर्टावर काढलेल्या मोर्चात अनेकांचं लक्ष वेधून घेतलेली ही तरुणी आहे... नेहा बोरा...नाम तो सुना ही होगा.. अशीच काहीशी नेहा बोराची ओळख गेल्या काही दिवसात दिल्लीच्या आंदोलनात पाहायतला मिळतेय. ..Gen-Z'च्या चळवळीचा प्रमुख चेहरा असलेली नेहा बोरा देशाच्या विरोधी पक्षांच्या आंदोलनात फ्रंटफूटवर दिसल्यानंतर राहुल गांधींच्या या मास्टरस्ट्रोकची सर्वत्र चर्चा सुरु झालीय...
एकीकडे CJPच्या आंदोलनानंतर देशातील सत्ताधाऱ्यांविरोधात रोष वाढत असताना राहुल गांधींनी जाणूनबुजून थेट CJPसोबत जाणं टाळलंय...कारण 2012 ला 'आम आदमी पार्टी'च्या आंदोलनामुळे दिल्लीतून कसा सफाया झाला हे काँग्रेस अद्याप विसरलेली नाही... आणि CJPवर आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच AAPची टीम असल्याचा आरोप होतोय... त्यामुळे नेहा बोरा काँग्रेसच्या नेतृत्वासोबत दिसल्यामुळे तिचं राजकीय वजन कसं वाढलयं... याआधी नेहा बोरा कशी चर्चेत आली...पाहूयात...
JNUमध्ये 'थिएटर अँड परफॉर्मन्स स्टडीज' या विषयात नेहा PHD करतेय
सामाजिक विषयावर पथनाट्य करून जनजागृतीचं कामही नेहा करत असते.
नेहा बोरा डाव्या विचारसरणीच्या AISAची राष्ट्रीय अध्यक्ष आहे
जून 2026 मध्ये नीट पेपरफुटीविरोधात जंतरमंतरवर नेहानं सलग 23 दिवस आमरण उपोषण केलं होतं
झारखंडमध्ये JPSC परीक्षेतील अनियमिततेविरुद्ध आंदोलनादरम्यान चेहऱ्यावर शाई फेकली गेल्यानंतर नेहा आणखीनच चर्चेत आली
ऑक्टोबर 2026 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनादरम्यान नेहाला तब्बल 9 वेळा पोलिसांनी ताब्यात घेतलं.
मुळात CJPच्या आंदोलनावेळी आमरण उपोषणाचा पवित्रा घेणारी नेहा GEN Z आंदोलनाचा चेहरा मानली जाते...अशातच राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून नेहा आंदोलनात सहभागी झाल्यानं CJPच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी एका दगडात दोन पक्षी मारण्याचं काम राहुल गांधींनी केलयं...नेहा बोराला देशाच्या राजकारणात राजकीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राहुल गांधींनी मोठा पुढारकार घेतला,....त्यामुळे नेहा भविष्यात काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? अशी चर्चा सुरु झालीय....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.