47 NTA OFFICIALS DISMISSED AMID STUDENT PROTESTS saam tv
देश विदेश

विद्यार्थ्यांचं आदोलन सुरू असताना मोदी सरकारची मोठी कारवाई; नीट पेपरफुटीप्रकरणी ४७ अधिकारी बडतर्फ

Neet Paper Leak 47 Officials Dismissed Modi Government Action: नीट पेपरफुटी प्रकरणात मोदी सरकारची मोठी कारवाई; एनटीएच्या 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ. देशभर विद्यार्थी आंदोलन तीव्र, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली.

Omkar Sonawane

नीट पेपरफुटी प्रकरणात मोदी सरकारने मोठी कारवाई केली असून नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीटपेपर फुटी प्रकरणाशी संबंधित तब्बल 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. मागच्या एक महिन्यांपासून कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. तसेच या आंदोलनाची व्याप्ती ही देशभर वाढल्याने ठिकठिकाणी तरुणाई एकत्र येत मोर्चा काढत आहे. यानंतर सरकारने मोठे पाऊल उचलले असून 47 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. मात्र शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कधी घेणार असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

जंतर-मंतरवरील सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पेपर माफियांवर पूर्ण लक्ष केंद्रित करत कारवाईला सुरुवात केली आहे. गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेल्या व्हिडिओनंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपरफुटीशी संबंधित विधेयकाला मंजुरी देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विधेयकात पेपरफुटी प्रकरणातील आरोपींवर जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांपर्यंत दंडाचा प्रस्ताव आहे. तसेच दोषी ठरलेल्या व्यक्तींना किमान 5 वर्षे आणि जास्तीत-जास्त 10 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. या दोन्ही परिस्थितीत दंडाची तरतूदही लागू राहणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या भारतीय कायद्यानुसार, पेपरफुटी प्रकरणातील दोषींना 3 ते 5 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. जर एखादी व्यक्ती फसवणूक किंवा संघटित पेपर लीक रॅकेटमध्ये सामील असल्याचे सिद्ध झाले, तर त्याला 10 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तरीही अशा घटना सातत्याने समोर येत असल्याने केंद्र सरकार आता हे कायदे आणखी कडक करण्याच्या तयारीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंदोलनामध्ये मारहाण करणे चुकीचे असे परत होता कामा नये-अमृता फडणवीस

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

Mamachya Govyala Jauya: कॉमेडी, अॅक्शन आणि सस्पेन्सचा फुल ऑन डोस! 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT