Crime Saam Digital
देश विदेश

Kota Student End Life : कोटामध्ये आणखी NEET विद्यार्थ्याने जीवन संपवलं, वर्षभरातील आकडेवारी चिंताजनक

Kota Student End Life : फरिद हा पश्चिम बंगालचा रहिवासी होता. तो शहरातील वक्फनगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता. सोमवारी सायंकाळी उशिरा त्याने आपल्या खोलीत गळफास लावून जीवन संपवलं.

प्रविण वाकचौरे

Kota Student End Life :

राजस्थानमधील कोटा येथे कोचिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची मालिका थांबवण्याचं नाव घेत नाही. पुन्हा एकदा एका विद्यार्थ्यांने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. कोटा येथे NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. फरिद हुसैन असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

फरिद हा पश्चिम बंगालचा रहिवासी होता. तो शहरातील वक्फनगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता. सोमवारी सायंकाळी उशिरा त्याने आपल्या खोलीत गळफास लावून जीवन संपवलं. आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्याला खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, फरिदसोबत इतर काही विद्यार्थी देखील राहत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी फरिद आपल्या खोलीतच होता. सहकाऱ्यांनी त्याला संध्याकाळी ४ वाजता पाहिलं होतं. मात्र ७ वाजेपर्यंत तो खोलीबाहेर आलाच नाही. त्याच्या मित्रांनी त्यानंतर दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर मुलांनी घराच्या मालकांना याबाबत सूचना दिली. मालकाने पोलिसांना याबाबत कळवलं त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (Latest News)

पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडला त्यावेळी फरिद गळफास घेतलेल्या अवस्थेत घरात आढळला. फरिदने आत्महत्या का केली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. घडलेल्या प्रकाराची सूचना त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली.

यावर्षी आतापर्यंत २८ विद्यार्थ्यांची आत्महत्या

राजस्थान सरकारने यावर्षी कोटामधील विद्यार्थ्यांना कोचिंग देण्याबाबत महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. 3 ऑक्टोबर रोजी कोचिंग सेंटर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याअंतर्गत मुलांना तणावमुक्त राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करताना कोचिंगच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांना काही दिवस विराम मिळाला होता. मात्र पुन्हा एकदा कोचिंगच्या आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. सध्या आत्महत्येमागील कारणांचा शोध सुरू आहे. यावर्षी आतापर्यंत 28 विद्यार्थी आत्महत्या केल्या आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत ही आकडेवारी चिंताजनक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आघाडीवर

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

SCROLL FOR NEXT