odisha train accident Saam Tv
देश विदेश

Odisha train tragedy: ओडिशा रेस्क्यू ऑपरेशननंतर NDRF जवानांना मानसिक धक्का; पाण्याच्या जागी दिसतंय रक्त, अन्नावरची भावना उडाली

Odisha train accident: एनडीआरएफच्या पथकातील जवानांना मानसिक धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे.

अभिजीत सोनावणे

Odisha train Accident: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तिहेरी रेल्वे अपघाताला पाच दिवस उलटून गेल्यानंतरही या दुर्घटनेतील अनेक भयावह कहाण्या समोर येत आहेत. या भीषण रेल्वे अपघातामध्ये २७८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर हजारापेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले होते.

तीन ट्रेनची धडक झाल्यामुळे घटनास्थळी रेल्वेचे डबे उलटेपालटे होऊन पडले होते. कोरोमंडल एक्सप्रेस आणि हावडा एक्स्प्रेसमधील प्रवासी या ट्रेनच्या डब्ब्यांमध्ये अडकून पडले होते. या सगळ्या जखमी प्रवाशांना आणि प्रत्येक मृतदेह बाहेर काढण्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) नऊ पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. (Latest Marathi News)

जवानांना मानसिक धक्का

एनडीआरएफच्या जवानांनी अहोरात्र कष्ट करून बचावकार्य राबवले होते. या जवानांनी उन्हातान्हात उभं राहून, रात्रीची झोप न घेता तब्बल ७२ तास अथक काम केले. ढिगाऱ्यांखालून आणि चेंदामेंदा झालेल्या रेल्वेच्या डब्ब्यांमधून जिवंत प्रवाशांना बाहेर काढणे.

तसेच छिन्नविछिन्न झालेले मृतदेह बाहेर काढून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याचे काम सतत सुरु होते. सतत या सगळ्या वातावरणात राहिल्यामुळे एनडीआरएफच्या पथकातील जवानांना मानसिक धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे.

जवानांना NDRF होतायेत भास

एनडीआरएफचे महासंचालक अतुल करवाल यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत बचाव पथकातील जवानांविषयी माहिती दिली. ओडिशा येथील रेस्क्यू ऑपरेशन संपल्यानंतर एनडीआरएफच्या जवानांना भ्रम होत आहेत. या जवानांना बचावकार्य राबवताना सतत जखमी लोक आणि विद्रुप झालेले मृतदेह हाताळावे लागत होते.

या जवानांनी अपघातस्थळावरुन १२१ मृतदेह बाहेर काढले होते. यापैकी अनेक मृतदेहांचे हातपाय धडावेगळे झाले होते, काहींचे चेहरे विद्रूप झाले होते. तर ओव्हरहेड वायरचा शॉक लागलेल्या प्रवाशांच्या मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झाला होता. हे एकूणच दृश्य अत्यंत भयावह होते. त्यामुळे आता बचावकार्य संपल्यानंतर एनडीआरएफच्या काही जवानांना भास होऊ लागले आहेत.

एका जवानाला आता पाणी पाहिले की रक्त बघितल्याचा भास होत आहे. तर आणखी एका एनडीआरएफच्या जवानाची अन्नावरची वासना पूर्णपणे उडाली आहे. मानसिक धक्का बसल्यामुळे या जवानांना अशाप्रकारचे भ्रम आणि त्रास जाणवत आहेत. डॉक्टरांकडून तातडीने या जवानांचे मानसिक समूपदेशन सुरु करण्यात आल्याची माहिती एनडीआरएफच्या महासंचालकांनी दिली.

जवानांच्या मनावर झालाय आघात : मानसोपचार तज्ज्ञ

जवानाच्या या स्थितीवर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जयंत ढाके यांनी मत व्यक्त केलं आहे. ढाके म्हणाले, ' ओडिशा येथील रेल्वे अपघात भयानक. तेथील सर्व चित्र भयावह होतं. जे मदत कार्य करणारे शेवटी मनुष्यच होते. सतत मदत कार्य करताना ते चित्र पाहून त्यांच्या मनावर आघात झाला, हे जाणवते. मदत कार्य करताना फारसं जाणवत नाही, मात्र एकांतात त्या प्रतिमा दिसतात'.

'अपघाताच्या ठिकाणी मृतदेह आणि जखमींचं रक्त असल्यानं मदत कार्य करणाऱ्यांचे देखील मन हेलावून जाते. यामुळे झोप न येणे, घाबरल्यासारखे होणे, जेवणारवची वासना उडणे, असं या लोकांना होतं. मनाने खचून जातात, त्यांना देखील मानसिक मदत मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या मनाला ही आराम मिळायला हवा. मनोबल वाढवण्यासाठी समुपदेशन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT