NDA Government Cabinet portfolios 
देश विदेश

Modi 3 Cabinet Portfolio: एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप; नितीन गडकरीसह इतर कोणत्या नेत्याला कोणतं मिळालं खातं? जाणून घ्या संपूर्ण मंत्रिमंडळ

NDA Government Cabinet portfolios: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलीय. अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना त्यांनी संभाळलेल्या मंत्रालयाचीच जबाबदारी यावेळीही देण्यात आलीय.

Bharat Jadhav

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आली. अनेक नितीन गडकरी, अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना जुन्याच मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय. मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वात महाराष्ट्रातील सहा नेत्यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रीपदाची माळ पडलीय. यात नितीन गडकरी, रामदास आठवले, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, आणि पीयुष गोयल यांना केंद्रीय मंत्रिपदे देण्यात आली आहेत.

असे आहे खातेवाटप

कॅबिनेट मंत्री

राजनाथ सिंह - संरक्षण मंत्रालय

अमित शाह- गृह मंत्रालय, सहकार मंत्रालय

नितीन गडकरी- रस्ते वाहतूक मंत्रालय

जेपी नड्डा- आरोग्य मंत्रालय, रसायन आणि खत मंत्रालय-

शिवराज सिंह चौहान- कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालय

एस जयशंकर- परराष्ट्र मंत्रालय

मनोहर लाल खट्टर- ऊर्जा आणि शहरी विकास मंत्रालय

एचडी कुमारस्वामी - अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रालय

पीयूष गोयल- वाणिज्य मंत्रालय

धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्रालय

जीतन राम मांझी- लघु उद्योग मंत्रालय

राजीव रंजन उर्फ ​​लालन सिंग- पंचायती राज मंत्रालय, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन विभाग

सर्बानंद सोनोवाल- जहाज व जलमार्ग मंत्रालय

के . राममोहन नायडू - नागरी विमान वाहतूक मंत्रालय

डॉ. वीरेंद्र कुमार- समाज कल्याण आणि सक्षमीकरण मंत्रालय

जुआनेल ओराम- आदिवासी व्यवहार मंत्रालय

प्रल्हाद जोशी- ग्राहक आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

अश्विनी वैष्णव- रेल्वे मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, आयटी मंत्रालय

गिरीराज सिंह- वस्त्रोद्योग मंत्रालय

ज्योतिरादित्य सिंधिया - दूरसंचार मंत्री आणि पूर्वोत्तर विकास मंत्रालय

भूपेंद्र यादव- पर्यावरण आणि वन मंत्रालय

गजेंद्र सिंह शेखावत- पर्यटन आणि संस्कृती मंत्रालय

अन्नपूर्णा देवी- महिला आणि बाल विकास मंत्रालय

किरेन रिजिजू- संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय

मनसुख मांडविया- कामगार मंत्रालय, युवा आणि क्रीडा मंत्रालय

हरदीप सिंग पुरी- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

जी. किशन रेड्डी- कोळसा आणि खाण मंत्रालय

चिराग पासवान- अन्न प्रक्रिया मंत्रालय

सीआर पाटील- जलशक्ती मंत्रालय

राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार

राव इंद्रजित सिंग - सांख्यिकी आणि नियोजन अंमलबजावणी राज्यमंत्री, सांस्कृतिक मंत्रालय

जितेंद्र सिंग- विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्रालय

अर्जुन राम मेघवाल- कायदा आणि न्याय मंत्री आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री

प्रतापराव जाधव- आयुष मंत्री, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री

जयंत चौधरी- कौशल्य विकास मंत्रालय, शिक्षण राज्यमंत्री

राज्य मंत्री

जितिन प्रसाद- पोलाद आणि वाणिज्य राज्यमंत्री, आयटी राज्यमंत्री

श्रीपाद नाईक- ऊर्जा राज्यमंत्री आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री

पंकज चौधरी - अर्थ राज्यमंत्री

कृष्णपाल गुर्जर- सहकार राज्यमंत्री

रामदास आठवले- सामाजिक आणि सक्षमीकरण राज्यमंत्री

रामनाथ ठाकूर- कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री

नित्यानंद राय - गृह राज्यमंत्री

अनुप्रिया पटेल- आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, रसायने आणि खते मंत्रालय

व्ही. सोमन्ना- जलशक्ती आणि रेल्वे राज्यमंत्री

चंद्रशेखर पेम्मासानी- ग्रामीण विकास राज्यमंत्री, दळणवळण राज्यमंत्री

एसपी सिंह बघेल- पंचायती राज आणि मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री

शोभा करंदलाजे- लघु उद्योग आणि कामगार राज्यमंत्री

कीर्तिवर्धन सिंह- परराष्ट्र राज्यमंत्री, वन आणि पर्यावरण राज्यमंत्री

बीएल वर्मा- ग्राहक राज्यमंत्री

शंतनू ठाकूर- जहाज व जलमार्ग मंत्री

कमलेश पासवान- ग्रामीण विकास राज्यमंत्री

बंदी संजय कुमार- गृह राज्यमंत्री

अजय टमटा- रस्ते वाहतूक राज्यमंत्री

डॉ. एल. मुरुगन- माहिती प्रसारण राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री

सुरेश गोपी- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री

रवनीत सिंह बिट्टू - अन्न प्रक्रिया आणि रेल्वे राज्यमंत्री

संजय सेठ- संरक्षण राज्यमंत्री

रक्षा खडसे- युवा आणि क्रीडा राज्यमंत्री

भगीरथ चौधरी - कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री

सतीश चंद्र दुबे - कोळसा आणि खाण राज्यमंत्री

दुर्गादास उईके- आदिवासी कार्य राज्यमंत्री

सुकांत मजुमदार- शिक्षण आणि ईशान्य विकास राज्यमंत्री

सावित्री ठाकूर - महिला आणि बालविकास राज्यमंत्री

टोखान साहू- नगरविकास राज्यमंत्री

राजभूषण चौधरी- जलशक्ती राज्यमंत्री

भूपती राजू श्रीनिवास वर्मा- अवजड उद्योग आणि पोलाद राज्यमंत्री

हर्ष मल्होत्रा- रस्ते वाहतूक राज्यमंत्री

निमुबेन बांभनियाम- ग्राहक व्यवहार राज्यमंत्री

मुरलीधर मोहोळ- सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री

जॉर्ज कुरियन- अल्पसंख्याक कल्याण आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री

पवित्रा मार्गेरिटा- परराष्ट्र व्यवहार आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Triekadash Yog 2025: १५ ऑगस्टपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु; बुध-मंगळ तयार करणार पॉवरफुल योग

Todays Horoscope: आज रक्षाबंधन असून आर्थिक निर्णय मार्गी लागतील; वाचा आजचं राशीभविष्य

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

SCROLL FOR NEXT