NDA Government formula HT
देश विदेश

NDA सरकारच्या मंत्रिमंडळाचं सूत्र ठरलं! भाजपकडे असणार ४ महत्त्वाची खाती, मित्रपक्षांना कोणती खाती मिळणार?

NDA Government : लोकसभा निवडणूक निकालात मागील वेळीच्या तुलनेत भाजपाची यावेळी पिछेहाट झालीय. त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांच्या मागणीत वाढ झालीय. प्रत्येक पक्ष अधिकची मंत्रि‍पदे मागत आहे, त्यामुळे एक नवा फॉर्म्युला ठरवला गेलाय.

Bharat Jadhav

प्रमोद जगताप, साम प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत जनतेने कोणत्याच पक्षाला बहुमत दिलं नाही. चारशे पार चा दावा करणाऱ्या भाजपला साधा २५० चा आकडा गाठता आला नाही. एनडीए मिळून २९४ जागा निवडून आल्यात. त्यामुळे भाजपचं नाही तर एनडीएच सरकार सत्तेत येत आहे.

सत्ता स्थापनेआधी एनडीएमधील नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी मंत्रालयासंदर्भात चर्चा केलीय. एनडीए सरकारमध्ये भाजपाला मित्रपक्षांना मोठा वाटा द्यावा लागणार आहे. प्रत्येकी ४ खासदारांमागे एक मंत्रिपद असं हे सूत्र ठरल्याची बातमी पुढे आली आहे. पंतप्रधान मोदींनी बुधवारी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे दिला. त्यानंतर एनडीएमधील घटक पक्षांची बैठक घेतली. यावेळी २१ पक्षांनी मोदींना समर्थन पत्र दिलं. आता एनडीएच्या सरकारचं मंत्रिमडळ कसं असेल याची माहिती सुत्रांनी दिलीय.

हाती आलेल्या माहितीनुसार, सरकारमधील भाजपला मित्र पक्षांना मोठा वाटा द्यावा लागणार आहे. प्रत्येकी 4 खासदारांच्या मागे एक कॅबिनेट मंत्रीपद असा नवा फॉर्म्युला ठरलाय. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाला ३ मंत्रीपद दिली जाणार आहेत. राष्ट्रीय लोकजन शक्ती पक्ष राम विलास या पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्या पक्षाला १ कॅबिनेट मंत्रीपद दिले जाणार आहे.

जितनराम मांझी यांच्या हिंदुस्थान आवामी मोर्चा पक्षाला १ कॅबिनेट मंत्री पद दिलं जाणार आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाला ४ कॅबिनेट मंत्री पद दिले जाणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रिपद मिळणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ कॅबिनेट मंत्रिपद, अनुप्रिया पटेल यांच्या अपना दलला १ मंत्रिपद तर जयंत चौधरी यांच्या पक्षाला १ मंत्रिपद आणि पवन कल्याण यांच्या जनसेनेला १ मंत्रिपद देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

तरीही भाजपकडे महत्वाची ४ खाती राहणार आहेत. भाजप स्वत:कडे गृह, वित्त आणि संरक्षण मंत्रालयासह आणखी एक महत्त्वाचे खाते ठेवणार असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या ३ राज्यांना डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाची खाती या राज्यांना दिली जाणार आहेत. एनडीएच्या वाटाघाटीत लोकसभा अध्यक्षपद, अर्थ, गृह आणि रेल्वे मंत्रालयात या खात्यावरून रस्सीखेच सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करताना काय काळजी घ्याल?

Raj Thackeray: 19 ऑक्टोबरला 'राज'कीय बॉम्ब फोडणार? राज ठाकरे युतीची घोषणा करणार?

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळ टोळीतील दोघांना केली अटक

Bihar Election: भाजपनं ५ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लावलं प्रचाराच्या कामाला; बिहार निवडणुकीत महाराष्ट्रातील ३ नेत्यांवरही मोठी जबाबदारी

Diwali 2025: कमी बजेट… अफलातून सजावट! दिवाळीत घर सजवण्यासाठी हे सोपे उपाय वापरून बघा

SCROLL FOR NEXT