देश विदेश

Amol Kolhe meet Amit Shah : अमोल कोल्हे गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अमोल कोल्हे त्यांच्या आगामी शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटानिमित्त अमित शाह यांच्या भेटीला गेले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. अमोल कोल्हे त्यांच्या आगामी शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटानिमित्त अमित शाह यांच्या भेटीला गेले होते.

अमोल कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या शिवप्रताप गरूडझेप सिनेमाची त्यांना माहिती दिली. तसेच दिल्ली येथे 'गरूडझेप'च्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी वेळ देण्याची विनंतीही केली. (Breaking Marathi News)

ज्या घटनेने ३५६ वर्षांपूर्वी देशाचे लक्ष वेधून घेत या मातीला स्वाभिमानाची शिकवण दिली, त्या ऐतिहासिक घटनेवर शिवप्रताप गरूडझेप हा सिनेमा आधारित आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा देशाचे लक्ष वेधावे व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशाच्या आणि पर्यायाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा, हाच उद्देश! असं अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं.

अमोल कोल्हे यांनी पुढे म्हटलं की, या भेटीत उत्तर व दक्षिण महाराष्ट्राला जोडणारा पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला संस्कार व छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेला संस्कार समजावून सांगणारा 'शिवसंस्कार सृष्टी' प्रकल्प व सर्वसामान्यांना माफक दरात आरोग्यसेवा देणारा इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प यासंदर्भात सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.

शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या या सर्व महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचा विश्वास मला माननीय गृहमंत्री महोदयांनी यावेळी दिला. आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल माननीय गृहमंत्र्यांचे अमोल कोल्हे यांचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv News : बांधकाम व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, टोळीकडून लोखंडी रॉडने मारहाण; धाराशिवमध्ये खळबळ, CCTV व्हिडिओ चर्चेत

Maharashtra Live News Update: डॉक्टर आत्महत्याप्रकरणी आरोपी गोपाल बदने यांची कोठडीतच खात्यांतर्गत चौकशी सुरू

Mirchi Bhaji: कुरकुरीत अन् झणझणीत मिरची भजी बनवण्याची सोपी ट्रिक;लगेच करा ट्राय

Liver Failure: कमी झोप अन् सतत थकवा जाणवतोय? असू शकतात लिव्हर फेल्युअरची लक्षणे, वाचा संपूर्ण माहिती

Honymoon Destination: हिवाळ्यात पार्टनरसोबत फिरण्यासाठी ही ठिकाणे आहेत बेस्ट!

SCROLL FOR NEXT