ममतादीदींचा पवारांना धक्का; राष्ट्रवादीच्या एकमेव आमदारालाच घेतलं तृणमूल काँग्रेसमध्ये... SaamTV
देश विदेश

ममतादीदींचा पवारांना धक्का; राष्ट्रवादीच्या एकमेव आमदारालाच घेतलं तृणमूल काँग्रेसमध्ये...

ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या धक्क्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चर्चिल आलेमाव यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे.

अनिश पाटील

गोवा : ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीला गोव्यामध्ये धक्का दिला आहे. गोव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार असणारे चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांनी ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. फक्त त्यांनी एकट्यानेच नव्हे तर हा प्रवेश करताना त्यांनी राष्ट्रवादीचा (NCP) विधीमंडळ गट तृणमूल काँग्रेसमध्ये विसर्जीत केला आहे.

हे देखील पहा -

मागील अनेक दिवसांपासून आमदार चर्चिल आलेमाव हे कन्या वालंका आलेमाव हिच्यासह तृणमूलमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पक्षातील सर्व सदस्यांसोबत चर्चिल यांनी अखेर तृणमूल काँग्रेसमध्य़े प्रवेश केला आहे. दरम्यान चर्चिल यांनी विधानसभा अध्यक्ष राजेश पाटणेकर यांना पत्र देत तृणमूलचा आमदार म्हणून विधानसभेत जागा देण्याची विनंतीही केली आहे.

आतापर्यंत तृणमूल पक्षात सामील होण्याचा निर्णय सतत लांबणीवर टाकणारे बाणावलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चिल आलेमाओ यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहत राष्ट्रवादीचा विधीमंडळ गट तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) विसर्जित केल्याची माहिती दिली.

राष्ट्रवादी आमदाराविरोधात न्यायालयात जाणार -

तृणमूल काँग्रेसने गोव्यामध्ये (Goa) प्रवेश करत विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर पक्षाच्या प्रचारासाठी ममता बॅनर्जी या 2 दिवसीय गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. गोव्यात आमदारकीचं खातं उघडण्यासाठी ममता यांनी खुद्द शरद पवारांनाच (Sharad Pawar) धक्का दिला आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारासह राष्ट्रवादीचा पुर्ण विधीमंडळ गटच तृणमूलमध्ये विसर्जीत केला आहे. आलेमाव यांच्या पक्षप्रवेशाने निवडणूक न लढताच तृणमूल काँग्रेसचा गोव्यात एक आमदार निश्चित झाला आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या धक्क्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चर्चिल अलेमाव यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : आयर्नची कमतरता फक्त महिलांमध्येच नाही, तर पुरुषांनीही जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

Private Bus Fares: टॅव्हल्सचा मनमानी कारभार, दिवाळीत प्रवाशांची लूट सुरू; पुणे ते नागपूर प्रवासासाठी ₹4200 भाडे

Maharashtra News Live Update: अंधेरी स्थानकात तिकीट तपासनीसाला महिला प्रवाशाने चावा घेतला!

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचं पुन्हा नशीब चमकलं! मिळाली टी-२० टीमची कॅप्टन्सी, आता दोन ट्रॉफी जिंकण्याचं लक्ष्य

Rmayana Review: 'रामायण' थिएटरमध्ये का पाहावा? रणबीर कपूरचा अभिनय, यशचा रुबाब आणि चित्रपटातील 'या' खास गोष्टी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT