धक्कादायक; नक्षलवाद्यांनी एकाच कुटुंबातील चौघांना फासावर लटकवले  Saam Tv
देश विदेश

धक्कादायक; नक्षलवाद्यांनी एकाच कुटुंबातील चौघांना फासावर लटकवले

बिहार मधील गया मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या डुमरिया ब्लॉकच्या मौनवर गावामध्ये नक्षलवाद्यांनी २ महिलांसह ४ जणांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : बिहार मधील गया मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या डुमरिया ब्लॉकच्या मौनवर गावामध्ये नक्षलवाद्यांनी २ महिलांसह ४ जणांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नक्षलवाद्यांनी या चौघांना देखील घराबाहेर फाशी दिली आहे. हे चौघे देखील एकाच कुटुंबामधील आहेत.

एवढेच नाही, तर नक्षलवाद्यांनी या ठिकाणी एका घराला आग देखील लावली आणि दुचाकी जाळली आहे. मारल्या गेलेल्यांमध्ये सतेंद्र सिंह, महेंद्र सिंह, मनोरमा देवी आणि सुनीता सिंह यांचा समावेश आहे. यानंतर नक्षलवाद्यांनी या ठिकाणी एक पत्रक लावले आहे. यावर लिहिले आहे की, मानवतेची हत्या करणारे आणि विश्वासघात करणाऱ्यांचा मृत्यू दंडाशिवाय पर्याय नाही. हा अमरेश, सीता, शिवपूजन आणि उदय या आमच्या ४ सहकाऱ्यांच्या हत्येचा बदला आहे.

हे देखील पहा-

भविष्यातही अशी कारवाई सुरूच राहणार आहे. त्यांना विष देण्यात आले होते. घटनास्थळी लावण्यात आलेले हे पत्रक जनमुक्ती छापाकार सेना, मध्य विभाग झारखंड, सीपीआय माओवादी यांच्या नावाने लावण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषयावर कोणी फारसे बोलायला तयार नाही. गया मुख्यालयामधील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

यासंदर्भात बोलताना एसएसपी आदित्य कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीवर प्रभाव पाडण्याकरिता नक्षलवाद्यांचे हे भ्याड कृत्य आहे. ज्या ठिकाणी चकमकीत ४ नक्षलवादी मारले गेले आहेत, त्याठिकाणी या हत्या करण्यात आले आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसरामध्ये शोधमोहीम सुरू केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT