Crime : मंदिरात चोरी करण्याआधी चोराने घेतला देवाचा आशीर्वाद

एक व्यक्ती मंदिरात जातो आणि चारही बाजूंना बघत आहे. यानंतर तो देवाच्या पाया पडतो आणि मग मंदिरामधील दानपेटी घेऊन तिथून फरार होतो
Crime : मंदिरात चोरी करण्याआधी चोराने घेतला देवाचा आशीर्वाद
Crime : मंदिरात चोरी करण्याआधी चोराने घेतला देवाचा आशीर्वादSaam Tv

ठाणे : अनेकदा तुम्ही ऐकले असेल, की कोणतेही काम करण्या अगोदर देवाचा आशिर्वाद घेणे खूप गरजेचे आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का की केवळ सामान्य लोकच नाही तर चोर देखील चोरी करण्या अगोदर देवाचा आशिर्वाद घेतले आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे . हा व्हिडिओ ठाण्याच्या नौपाडा या ठिकाणचा आहे. हा व्हिडिओ बघून तुम्ही देखील म्हणलं पाहिजे की हा चोर अजबच आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. यामध्ये एक चोर मंदिरामधील दानपेटी चोरताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता, की एक व्यक्ती मंदिरात जातो आणि चारही बाजूंना बघत आहे. यानंतर तो देवाच्या पाया पडतो आणि मग मंदिरामधील दानपेटी घेऊन तिथून फरार होतो. फुटेज बघून असे वाटते की त्याचा दुसरा साथीदार देखील मंदिराच्या बाहेर त्याची वाट बघत आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना तेव्हा घडली जेव्हा पुजारी मंदिरामधून बाहेर गेले होते. ते परत आले, तेव्हा दानपेटी गायब होती. पुजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार की दानपेटीत १ हजार रुपयेच होते. ३० सेकंदाचा हा व्हिडिओ फेसबुकवर Rationalist नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, दानपेटी चोरण्याअगोदर चोर देवाच्या पाया पडला. बातमी देईपर्यंत या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले होते, तर अनेकांनी व्हिडिओ लाईक देखील केला आहे.

Crime : मंदिरात चोरी करण्याआधी चोराने घेतला देवाचा आशीर्वाद
गडचिरोली पोलिसांचे नक्षलवाद्यांवर ' सर्जिकल स्ट्राइक'; 'अशी' राबवली मोहीम

अनेकांनी या व्हिडिओवरती मजेशीर कमेंट देखील केले आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले आहे की, हा चोर चोरी करण्या अगोदर माफी मागत आहे. नक्कीच त्याला पैशांची फार गरज असेल, म्हणून तो मंदिरात चोरी करत आहे. आणखी एका यूजरने लिहिले आहे, की मला तर हा चोर अतिशय निर्मळ मनाचा दिसत आहे. याशिवाय अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर कमेंट करण्यात आले आहेत.

या प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी मीडियाबरोबर बोलताना सांगितले आहे की, ही चोरी मंदिराच्या आसपास राहणाऱ्या परिसरामधील कोणीतरी केली आहे. कारण स्थानिक लोकांनाच हे माहिती असते की कोणत्या वेळी मंदिरात कोणीच नसतं. सध्या अनेक स्थानिक लोकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ दाखवण्यात आला आहे. यामधून संशयित आरोपीबद्दल अनेक पुरावे मिळाले आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी संध्याकाळी केजस म्हसदे (वय-18) याला अटक करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com