Crime News Google
देश विदेश

Crime News: नॅशनल लेव्हल खेळाडूची ५ गोळ्या झाडून हत्या, मैत्रिणीला घरी भेटायला गेला अन् घात झाला

Power Lifter Killed In Rohtak: रोहतकमध्ये नॅशनल लेव्हल खेळाडूची ५ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

Ankush Dhavre

राष्ट्रीय स्तरावरील पॉवरलिफ्टरसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. बाईक पार्किंगवरुन झालेल्या वादावरुन असं काही घडलं की, ऐकताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या पॉवरलिफ्टरसोबत असा काही प्रकार घडला, की त्याला आपल्या जीव गमवावा लागला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

जिल्हास्तरीय सुवर्णपदकविजेता आणि राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक विजेता असलेला २० वर्षीय वंश आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी गेला असता, एका अज्ञाताने त्याची गोळी झाडून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना रोहतकमध्ये घडली आहे.

दुपारचे ३ वाजले होते. वंश आपल्या वर्गमैत्रिणी अक्षीता आणि वंशिका यांच्याकडे चार्जर घेण्यासाठी आला होता. त्याने आपली मोटरसायकल रस्त्याच्या कडेला पार्क केली आणि तो आत निघून गेला. इतक्यात एक कार चालक तिथून जात होता.

त्यावेळी कारचालक कुलदीप जोरजोरात हॉर्न वाजवू लागला. हॉर्नचा आवाज ऐकून वंश बाहेर आला. कार चालकाच्या मते, वंशने पार्क केलेल्या मोटर सायकलमुळे त्याला पुढे जाता येत नव्हते. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली. अक्षीता आणि वंशिकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुलदीपने त्या दोघींनाही शिविगाळ केला. हे वंशला पटलं नाही.

वंशने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. इतक्यात कुलदीप गेला, त्याने कारचा दरवाजा उघडून पिस्तूल बाहेर काढली आणि वंशवर गोळीबार केला. त्याने पोटात २, छातीवर १, तोंडात १ आणि पाठीत १ गोळी झाडली. या हल्ल्यात वंश गंभीर जखमी झाला. रक्ताची धार लागली असलेल्या वंशला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

गोळीबार करुन पळ काढणाऱ्या कुलदीपवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलदीप रेती व्यवसाय करतो. वंशबद्दल बोलायचं झालं, तर ज्या दिवशी त्याची हत्या झाली, त्याच दिवशी दिल्लीत त्याचा वडिलांचे किडनीचे ऑपरेशन होणार होते. असे वंशच्या कुटुंबातील सदस्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT