NASA Warns Of Major Solar Storm saam tv
देश विदेश

NASA Warns Solar Storm: आपल्याला काही महिने इंटरनेटशिवाय राहावे लगणार? नासाकडून मोठ्या सौर वादळाचा इशारा

Chandrakant Jagtap

NASA Warns Of Major Solar Storm: विचार करा तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पीसीमध्ये इंटरनेटच नसेल तर? विचार करवत नाही ना. परंतु आगामी काळात हे आपल्यासोबत घडण्याची शक्यता आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या (NASA) शास्त्रज्ञांनी एका मोठ्या सौर वादळाच्या इशारा दिला आहे. या वादळाच्या संभाव्य परिणामाबद्दल सांगताना नासाने आपल्याला काही महिने इंटरनेटशिवाय राहावे लागू शकते अशी शक्यता देखील व्यक्त केली आहे.

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने (NASA) संभाव्य "इंटरनेट एपोकॅलिप्स" म्हणजेच इंटरनेट सर्वनाशाचा धोका टाळण्याच्या प्रयत्नांच्या मिशनचा भाग म्हणून एक अंतराळ यान लॉन्च केले आहे, ज्यामुळे लोकांना काही महिन्यांपर्यंत इंटरनेट सेवेशिवाय राहावे लागू शकते.

मिररच्या रिपोर्टनुसार, यूएस स्पेस एजन्सीच्या पार्कर सोलर प्रोबने (PSP) सोलार वाइंड्सद्वारे नेव्हिगेट करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. त्यानंतर शास्त्रज्ञांनी आगामी सौर वादळाच्या संभाव्य परिणामांविषयी इशारा देखील दिला आहे. त्याला सामान्यतः "इंटरनेट एपोकॅलिप्स" म्हणून संबोधले जाते आणि ते पुढील दशकात धडकण्याची शक्यता आहे.

नासाने 2018 मध्ये प्रक्षेपित केलेल्या या अंतराळयानाने एक उल्लेखनीय प्रवास केला आणि जिथे सोलार वाइंड्स म्हणजेच सौर वारा निर्माण होतो तिथे सूर्याच्या पृष्ठभागाच्या जवळ पोहोचले. रिपोर्टनुसार सौर वाऱ्यामध्ये सूर्याच्या बाह्य वातावरणातून बाहेर पडणाऱ्या चार्ज कणांचा एक सतत प्रवाह असतो, त्याला 'कोरोना' (corona) असे म्हणतात. (Marathi Tajya Batmya)

'इंटरनेट एपोकॅलिप्स'

तीव्र उष्णता आणि किरणोत्सर्गाची कठोर परिस्थिती असूनही पार्कर सोलर प्रोबने सूर्याच्या कार्याविषयी महत्त्वाची माहिती गोळा करण्यात सातत्य ठेवले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्रोफेसर स्टुअर्ट बेल यांनी या अभ्यासाचे प्रमुख लेखक म्हणून काम केले. त्यांनी सौलार वाइंड्स समजून घेण्याचे महत्त्व अधिक स्पष्ट केले आहे. (Latest Political News)

“वारे सूर्यापासून पृथ्वीवर बरीच माहिती घेऊन जातात. त्यामुळे सूर्याच्या वाऱ्यामागील यंत्रणा समजून घेणे पृथ्वीवरील व्यावहारिक कारणांसाठी महत्त्वाचे आहे,” असे बेल यांनी नमूद केले. तसेच "सूर्य ऊर्जा कशी सोडतो आणि भूचुंबकीय वादळे कशी चालवतो हे समजून घेण्याच्या आमच्या क्षमतेवर याचा परिणाम होणार आहे, ज्यामुळे आपल्या कम्युनिकेशन नेटवर्कला धोका आहे", असेही ते म्हणाले. अशा घटनेमुळे लोक अनेक महिने किंवा वर्षांसाठी इंटरनेटचा प्रवेश गमावू शकतात. तसेच उपग्रह आणि पॉवर लाईन्स निरुपयोगी होऊ शकतात. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता

वेडा झालाय का? चक्क वाघाच्या पाठीवर बसून फेरफटका, पाकिस्तानमधला Video Viral, नेटकऱ्यांमध्ये संताप

NCLT सोमवारी राकेश वाधवान यांच्या याचिकेवर करणार सुनावणी, काय आहे प्रकरण?

Fraud Case : व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक; नागपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Assembly Election : सलील देशमुख विधानसभा लढवणार? पाहा Video

SCROLL FOR NEXT