नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली; पंतप्रधान पदासाठी 'या' नावांना सर्वाधिक पसंती 
देश विदेश

नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली; पंतप्रधान पदासाठी 'या' नावांना सर्वाधिक पसंती

या विविध घटनांच्या पार्श्वभुमीवर एका इंग्लिश वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ६६ टक्क्यांवरुन २४ टक्क्यांवर आल्याचं म्हटलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोरोना महामारीमुळे (Corona epidemic) देश आणि संपुर्ण जगात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थव्यवस्थेसह (Economy) आरोग्यव्यवस्थाही (Healthcare) कोलमडली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांनी आपला जीव गमावला. इतकेच नव्हे नैसर्गिक आपत्तीनेही देशात लाखोंचे वित्तीय नुकसान झाले. कोरोना महामारी, नैसर्गिक आपत्ती, महागाई, शेतकरी आंदोलने अशा एक ना अनेक कारणांमुळे आज देशात चिंतेते वातावरण आहे.

या विविध घटनांच्या पार्श्वभुमीवर एका इंग्लिश वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ६६ टक्क्यांवरुन २४ टक्क्यांवर आल्याचं म्हटलं आहे. इंडिया टूडे मूड ऑफ द नेशन पोलने हे सर्वेक्षण केले आहे.

हे देखील पहा -

या सर्व्हेत, देशाचा पुढील पंतप्रधान कोण असावा? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाला ६६ टक्के लोकांची पसंती मिळाली होती. मात्र या प्रश्नावर जानेवारी २०२१ मध्ये ३८ टक्के, ऑगस्ट २०२१ मध्ये फक्त २४ टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दिली होती.

या सर्वेक्षणातून असे दिसून येते की, पंतप्रधानांची लोकप्रियता घटल्याचे म्हणजेच कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे या सर्वेक्षणातून दुसरी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. भाजपाच्या दोन नेत्यांची लोकप्रियता वाढल्याच दिसुन आले आहे.

सर्वेक्षणानुसार, ऑगस्ट २०२१ मध्ये पंतप्रधानपदासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाला ७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. जानेवारी २०२१ मध्ये ८ टक्के तर ऑगस्टमध्ये ४ टक्के लोकांनी पंसती दिली आहे.

यात पंतप्रधानपदासाठी दुसरे नाव आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे. ऑगस्ट २०२१ मध्ये पंतप्रधानपदासाठी ११ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथांनी पसंती दिली आहे. तर जानेवारी २०२१ मध्ये १० टक्के आणि ऑगस्ट २०२० मध्ये केवळ ३ टक्के लोकांनी पसंती दर्शवली होती.

राहूल गांधीच्या नावालाही पंसती

कॉंंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नावालादेखील देशातील नागरिकांनी पंसती दिली आहे.

ऑगस्ट २०२० मध्ये ८ टक्के, जानेवारी २०२१ मध्ये ७ टक्के तर ऑगस्ट २०२१ मध्ये १० टक्के लोकांनी राहूल गांधीना पसंती दिली आहे. राहूल गांधीच्या नंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा आहे. ऑगस्ट २०२० मध्ये केवळ २ टक्के, जानेवारी २०२१ मध्ये ४ टक्के तर ऑगस्ट २०२१ मध्ये ८ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी अरविंद केजरीवाल यांना पसंती दर्शवली.

यात विशेष म्हणजे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. ऑगस्ट २०२० केवळ २ टक्के असलेला आकडा ऑगस्ट २०२१ मध्ये ८ टक्क्यांवर पोहचला आहे. मात्र प्रियंका गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची लोकप्रियता घटल्याचेही या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: शाळेत हत्येचा थरार! नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकलं, जमावाकडून शाळेची तोडफोड

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT