PM Narendra Modi  Saam tv
देश विदेश

PM Modi Oath : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार; पंडित नेहरू यांच्या ‘त्या’ विक्रमाची बरोबरी करणार

Narendra Modi Oath : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून ते पंडित नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करणार आहेत.

Satish Daud

नरेंद्र मोदी आज रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी राष्ट्रपती द्रौपती मुर्मू मोदींना पंतप्रधानपदाची शपथ देतील. या सोहळ्याला अनेक देशांमधील नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ८ हजार लोक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे.

विशेष बाब म्हणजे शपथविधीनंतर नरेंद्र मोदी एक नवा इतिहास रचतील. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे ते दुसरे व्यक्ती ठरतील. याआधी पंडित नेहरू यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंडित नेहरू १९४७ ते १९६४ अशी १७ वर्षे देशाचे पंतप्रधान होते.

पंडित नेहरू हे सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. त्यांची लोकप्रियता अफाट होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेहरू यांनी अनेक वर्षे तुरुंगात काढली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं तिन्ही निवडणुका निर्विवाद जिंकल्या होत्या. दुसरीकडे मोदी यांचे समर्थक आजवर मोदींनाच सर्वात लोकप्रिय पंतप्रधान मानतात.

दरम्यान, नरेंद्र मोदी रविवारी शपथ घेण्यापूर्वी सकाळी ७ वाजता राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींना नमन करणार आहेत. तसेच ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मारकावर जाऊन दर्शन घेतील. यानंतर नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय समर स्मारक येथे जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी G20 शिखर परिषदेसारखी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवन परिसरातही सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निमलष्करी दल आणि दिल्ली सशस्त्र पोलिसांच्या पाच कंपन्यांसह २,५०० पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय NSG कमांडो सुद्धा सुरक्षेत असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT