Prime Minister Narendra Modi addresses a gathering after surpassing Jawaharlal Nehru’s tenure record in office. Saam tv
देश विदेश

PM मोदींनी मोडला जवाहरलाल नेहरुंचा रेकॉर्ड; 4398 दिवस पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधानांनी काय सांगितलं?

Narendra Modi Breaks Nehru Record 4398 Days Tenure: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरूंचा 4,398 दिवसांचा कार्यकाळ मागे टाकत नवा इतिहास रचला. या विक्रमावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून मोदींनी भाषणातून देशवासियांचे आभार मानले.

Omkar Sonawane

देशाच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. सलग 3 वेळा जनतेचा कौल मिळवत सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या पंतप्रधानपदावरील 4398 दिवसांच्या कार्यकाळाचा विक्रम मागे टाकला आहेत.मात्र या विक्रमावरुनही आज सकळपासूनच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरु झाले.

नेहरुंच्या कार्यकाळाची बरोबरी होईल मात्र नेहरुंची बरोबरी होणार नाही अशा शब्दात काँग्रेसनं भाजपला प्रत्युत्तर दिले. तर मोदींचे भविष्यातील रेकॉर्ड कुणीही मोडू शकणार नाही असा दावा भाजपनं केला. पंतप्रधान मोदींच्या कारकीर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिम्मित भाजपकडून मेगा प्लॅनिंग सुरु आहे. उद्यापासून प्रगती पथ यात्रा सुरु होणार असून यामध्ये सर्व खासदार, मंत्री, आमदार आणि नेते सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी एनडीएमधील सर्व घटक पक्ष हे दिल्लीमध्ये गेले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून तपपूर्ती कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करत देशाचे अभिनंदन केले आणि कॉँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT