Narendra Modi Speech In Lok Sabha Over women reservation bill saam tv
देश विदेश

Women Reservation bill : महिला आरक्षणावर बोलताना पंतप्रधान मोदींची विरोधकांना खुली ऑफर; म्हणाले, मी ब्लँक चेक देतो, पण...

Women Reservation Bill PM Modi speech in Lok Sabha : नारीशक्ती वंदन घटनादुरुस्ती विधेयकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरुवारी लोकसभेत निवेदन केले. यावेळी त्यांनी विरोधकांना चिमटे काढले. गॅरंटी देतानाच, क्रेडिट देण्याची ऑफरही देऊ केली.

Nandkumar Joshi

महिलांचे आरक्षण मतदारसंघांच्या फेररचनेशी जोडणाऱ्या नारीशक्ती वंदन घटनादुरुस्ती विधेयकावर (Nari Shakti Vandan Bill) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाष्य केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी सर्व पक्षांना एकजुटीचं आवाहन केलं. या विधेयकाला राजकीय तराजूमध्ये मोजू नका. याचं राजकीय श्रेय घेण्याचा हेतू नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून हे विधेयक मंजूर करावे, असे आवाहन मोदींनी विरोधकांना केले.

यावेळी मोदींनी विरोधकांना चिमटेही काढले. याशिवाय त्यांना 'ऑफर'ही देऊन टाकली. तुम्हाला हवं तर तुम्ही याचं श्रेय घेऊ शकता. पण हे विधेयक मंजूर करा. हवं तर मी तुम्हाला क्रेडिटचा ब्लँक चेक देत आहे. याचं क्रेडिट तुम्हाला हवं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर, सरकारी पैशांतून तुमचे सर्वांचे फोटो देखील छापण्याची तयारी आहे, असं मोदी म्हणाले. तुम्ही ज्यांचे फोटो द्याल, त्यांचे फोटो सरकारी खर्चातून छापण्यात येतील, पण या विधेयकाला सभागृहात मंजूर होऊ द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मतदारसंघ पुनर्रचनेत (Delimitation Bill 2026) कोणत्याही राज्यासोबत भेदभाव होणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. एका महिला खासदारानं याची गॅरंटी काय असा सवाल केला. त्यावर ही माझी गॅरंटी आहे, असं मोदींना ठामपणे सांगितले. जर तुम्ही याला आश्वासन संबोधत असाल तर, हे मी दिलेले आश्वासन आहे, असे समजा. ही निर्णय प्रक्रिया कुणासोबतही भेदभाव करणार नाही. जागांची विभागणी ही पूर्वीसारखीच कायम राहील, असंही ते म्हणाले.

'यात माझा काही स्वार्थ नाही'

देशाच्या नारीशक्तीला आपण काही देत आहोत, या भ्रमात राहू नका. इथे माझ्या आणि तुमच्याबद्दल बोलत नाही. हा त्यांचा अधिकार आहे. आपण अनेक दशकांपासून ते रोखलं आहे. आता त्याचं प्रायश्चित करून गुन्ह्यातून मुक्त होण्याची संधी आहे. यात कशाप्रकारे चलाखी केली आहे, हे आपण सगळे जाणतो आहोत. प्रत्येक वेळी काही ना काही तांत्रिक अडथळे आणून ते रोखण्यात आले. पण आता देशातील महिलांना काही समजावू शकत नाही. सभागृहातील संख्येचं गणित नंतर समोर येईल. तीन दशकांपासून हे अडकवण्यात आले. जे करायचं ते केलं. आता सगळं सोडून द्या. इथल्या काही लोकांना वाटतं की यात मोदींचा राजकीय स्वार्थ आहे. पण मी स्पष्टपणे सांगतो की माझा यात कोणताही राजकीय स्वार्थ नाही. पण जर तुम्ही विरोध केला तर, त्याचा लाभ नक्की आम्हाला होईल, असा गर्भित इशाराही मोदी यांनी यावेळी विरोधकांना दिला.

'महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल'

२५-३० वर्षांपूर्वी कुणी याचा विरोध केला तेव्हा त्याचा परिणाम अधिक प्रमाणात झाला नव्हता. पण आता ती चूक करू नका. आता महिला या ओपिनियन लीडर आहेत. त्या आता बोलू लागल्या आहेत. आता महिला आपलं परखत मत मांडू शकतील. त्यामुळे विरोध करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे. आता महिलांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे. गेल्या २५-३० वर्षांत लाखो महिला नेतृत्व करू लागल्या आहेत. तळागाळात नेतृत्व करणाऱ्या महिला आता अशा लोकांना माफ करणार नाहीत. महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांना दीर्घकाळ त्याची किंमत मोजावी लागेल. महिला सभागृहात मोठ्या संख्येने आल्या तर, त्या बरेच निर्णय घेतील, असेही मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या कडक बंदोबस्त

Cardamom Benefits: जेवणानंतर दररोज खा वेलची; शरीरात होतील 8 बदल, अपचनाचाही त्रास होईल कमी

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

SCROLL FOR NEXT