PM narendra Modi  saam tv
देश विदेश

PM Modi decision : पेट्रोल-डीझेल बचतीच्या आवाहनानंतर स्वतः PM मोदींनी घेतला मोठा निर्णय, देशभरात जोरदार चर्चा

modi convoy cut after fuel saving message : पेट्रोल-डीझेल बचतीच्या आवाहनानंतर टीका होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी करण्याचा निर्णय घेऊन नवा आदर्श घालून दिला आहे. फक्त दोन वाहनं घेऊन ते घरातून थेट कॅबिनेट बैठकीसाठी रवाना झाले.

Nandkumar Joshi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल - डीझेल बचतीचं आवाहन देशवासियांना केलं होतं. यावरून देशभरात जोरदार चर्चा झाली. त्यांच्या या आवाहनानंतर स्वतः पंतप्रधान मोदींनी त्याची अंमलबजावणी करावी, अशा प्रतिक्रिया विरोधकांपासून ते सर्वसामन्यांकडून ऐकायला मिळाल्या. अखेर पंतप्रधान मोदींनी याची सुरुवात स्वतःपासूनच केली. घरातून दोन वाहनांचा ताफा घेऊन मोदी कॅबिनेट बैठकीसाठी रवाना झाले. एका वाहनातून ते स्वतः निघाले. तर दुसऱ्या वाहनात त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात एसपीजी कमांडो होते.

पंतप्रधान मोदींनी रविवारी हैदराबादमधील एका सभेत पेट्रोल-डीझेल बचतीचं आवाहन केलं होतं. पेट्रोल-डीझेल आणि गॅस यांचा जपून वापर करावा, असे ते म्हणाले होते. तसेच वर्षभर सोनं खरेदी करणं टाळा, परदेशी पर्यटनाला जाणे टाळावे, असे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर केंद्र सरकारमधील मंत्री आणि अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाहन ताफा कमी केला होता. तसेच अनेक बैठका ऑनलाइन घेण्याचा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह दिल्ली, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महत्वाचे निर्णय घेतले होते.

लोकचळवळीचं स्वरूप येणार; भाजप अध्यक्षांची प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदी हे दोन वाहनांचा ताफा घेऊन कॅबिनेट बैठकीसाठी निघाल्यानंतर भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतः एक आदर्श घालून दिला आहे. आता ही योजना एक लोकचळवळ म्हणून उभी राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदींनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करून सिद्ध केलं की ते खरोखरच देशाचे प्रधानसेवक आहेत. जेव्हा एखादं नेतृत्व आदर्श घालून देतं, तेव्हा ती लोकचळवळ होते. मोदींकडून प्रेरणा घेऊन मी सुद्धा ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करणार आहे, असं नवीन म्हणाले. आपण सर्वांनी मिळून देशहितासाठी आपलं योगदान देऊयात, असंही आवाहन त्यांनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT