"राखा को पकड़ के दिखाओ, राखा वापस आ रहा है!" तरुणाचे पोलिसांना चॅलेंज!  SaamTvNews
देश विदेश

Nagpur | "राखा को पकड़ के दिखाओ, राखा वापस आ रहा है!" तरुणाचे पोलिसांना चॅलेंज!

नागपूर च्या गुन्हे शाखा युनिट-3 पोलिसांनी अश्या एका आरोपीला अटक केली ज्याने बिहार पोलिसांना खुल चॅलेंज दिलं होतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर च्या गुन्हे शाखा युनिट-3 पोलिसांनी अश्या एका आरोपीला अटक केली ज्याने बिहार पोलिसांना खुल चॅलेंज दिलं होतं. "भागलपूर के एसपी को खुला चॅलेंज ,राखा को पकड़ के दिखाओ, राखा वापस आ रहा है, हिसाब-किताब लेने के लिए - राखा तनवीर" असा मेसेज बिहार च्या भागलपूर पोलिसांना आरोपीने पाठवला.

हे देखील पहा :

या मॅसेजमुळे भागलपूर पोलिसांत खळबळ माजली, तथाकथित राखा चा हा मेसेज सगळ्या पोलीस दलात वाऱ्यासारखा पसरला! मात्र, या राखा बद्दल नागपूर च्या गुन्हे शाखा युनिट 3 च्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की बिहारच्या भागलपूर येथील काही युवक मोमीनपुरा भागात राहतात आणि ते शिवणकाम करतात. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन तपास केला असता त्यात मोहमद तनवीर मोहमद मंजूर आलम उर्फ राख हा पोलिसांना सापडला. त्याची अधिकची चौकशी केली असता बिहार पोलिसांना चॅलेंज करणारा हाच आरोपी असल्याचं पुढे आलं आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

बिहार मधील जवळपास पाच ते सहा गुन्ह्यात तो आरोपी असून फरार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून राखा नामक युवक नागपुरात लपून बसला आहे. मात्र, नागपुरात त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही. भागलपूर पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. त्याला बिहार पोलिसांच्या हवाले करण्यात आलं. मोमीनपुरा परिसरात लपून बसलेला हा आरोपी कुख्यात हार्डकोर गुन्हेगार असून त्याने चक्क बिहार पोलिसांनाच चॅलेंज केलं. मात्र नागपूर पोलिसांसमोर मात्र त्याचा टिकाव लागला नाही.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Taj Mahal construction cost: ताजमहाल बनवणयासाठी त्या काळात किती खर्च आला होता?

Municipal Elections Voting Live updates : नवी मुंबई तुर्भेतील मतदारांचा संताप; संपूर्ण नवी मुंबईतील सर्वात खराब मतदान यंत्रणा तुर्भेलाच?

Astro : तुमचं बाळ सतत आजारी पडतंय? नजर लागलीये? मग आताच करा हा घरगुती उपाय

Nivedita Saraf: एक तास मतदान केंद्रांवर हेलपाटे...; निवडणूक आयोगाच्या भोंगळ नियोजनावर निवेदिता सराफ संतापल्या

Crime News : गावावरून वडिलांसाठी शहरात आला, मैत्रीनं घात केला; रस्त्यात गाठून विद्यार्थ्याला निर्दयीपणं संपवलं

SCROLL FOR NEXT