Air india representative image
देश विदेश

Air India Bomb Threat: खळबळजनक! एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई-न्यूयॉर्क फ्लाईट दिल्लीकडे वळवली

Air India flight Bomb Threat: विमान सध्या दिल्ली विमानतळावर आहे आणि विमानातील प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व मानक सुरक्षा प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केले जात आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. १४ ऑक्टोबर

Air India flight Emergency Landing: दिल्लीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात बाँब असल्याच्या धमकीने एकच खळबळ उडाली, ज्यानंतर एअर इंडियाच्या विमानाचे दिल्लीत इमर्जन्ससी लँडिग करण्यात आले आहे. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर बचाव पथकाने विमानाची झाडाझडती घेतली, मात्र कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळली नसून सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

एअर इंडियाच्या विमानाचे सोमवारी सकाळी दिल्लीच्या IGI विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर हे लँडिंग करण्यात आले. विमान मुंबईहून न्यूयॉर्कला जात होते. सुरक्षेच्या कारणास्तव एअर इंडियाचे विमान तातडीने दिल्लीकडे वळवण्यात आले. विमान सध्या दिल्ली विमानतळावर आहे आणि विमानातील प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केले जात आहे.

एअर इंडियाकडून निवेदन..

एअर इंडियाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, '14 ऑक्टोबर रोजी मुंबईहून JFK ला उड्डाण करणारे विमान AI119 ला विशेष सुरक्षा इशारा मिळाला आणि सरकारच्या सुरक्षा नियामक समितीच्या सूचनेनुसार ते दिल्लीकडे वळवण्यात आले. सर्व प्रवासी उतरले आहेत आणि दिल्ली विमानतळ टर्मिनलवर आहेत. या अनपेक्षित व्यत्ययामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय कमी करण्यासाठी मैदानावरील आमचे सहकारी प्रयत्न करत आहेत. एअर इंडिया आपल्या प्रवासी आणि चालक दलाच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे आणि त्याला सर्वोच्च प्राधान्य देते.

दरम्यान, गेल्या महिन्यातही मुंबईहून आलेल्या एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी मिळाली होती, त्यानंतर तिरुअनंतपुरम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. विमानाच्या वॉशरूममध्ये टिश्यू पेपरवर फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचे लिहिलेले आढळून आले. यानंतर तातडीने कारवाई करून नंतर लँडिंग करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT