Mumbai to Mangaluru new Vande Bharat route AI Photo
देश विदेश

Vande Bharat : मुंबईला आणखी एक वंदे भारत मिळणार, पण... रेल्वेचा मास्टरप्लान काय?

Mumbai to Mangaluru new Vande Bharat route : मुंबईला लवकरच आणखी एक वंदे भारत मिळण्याची शक्यता आहे. मुंबई ते मंगळुरू ही वंदे भारत लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai New Vande Bharat route : मुंबईहून सध्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर, शिर्डी यासह अनेक महत्त्वाच्या शहरासाठी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहे. त्यामध्ये आणखी एका वंदे भारतची भर पडणार आहे. मुंबई ते मंगळुरू यादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे रेल्वेकडून या मार्गावर नवीन वंदे भारत आणण्याचा प्लॅन सुरू आहे. मुंबई ते मंगळुरू या मार्गावर प्रवास करणाऱ्यांकडून वंदे भारत ट्रेनची मागणी केली होती, त्याचा रेल्वेकडून विचार करण्यात येत आहे.

रेल्वेकडून मुंबई ते मंगळुरू या मार्गावर नवीन वंदे भारत सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी मुंबई-गोवा आणि गोवा-मंगळुरू या दोन मार्गावर सुरू असणाऱ्या वंदे भारत जोडल्या जाऊ शकतात. म्हणजे. मुंबई-गोवा-मंगळुरू अशी एकच वंदे भारत ट्रेन सुरू केली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. मुंबई-गोवा आणि गोवा मंगळुरू या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांची संख्या ७० टक्के इतकीच आहे. मुंबई-मंगळुरू या मार्गावर वंदे भारत सुरू झाल्यास प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मुंबईहून मंगळुरूला पोहचण्यासाठी वंदे भारतला १२ तास लागू शकतात.

मंगळुरू-गोवा वंदे भारतला अल्प प्रतिसाद -Low passenger numbers on Mangaluru-Goa route

मंगळुरू-गोवा मार्गावर नुकतीच वंदे भारत ट्रेन सुरू झाली. पण या मार्गावरील वंदे भारतला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. फक्त ४० टक्के प्रवासी या मार्गावर वंदे भारतने प्रवास करतात. वंदे भारतचा हा मार्ग Kozhikode प्रयत्न वाढवण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. कर्नाटकमधील राजकीय नेत्यांनी याला नकार दिला.

मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन बंद होणार ?

मंगळुरू ते गोवा हे अंतर वंदे भारतने सध्या साडेचार तासात पार होते. मुंबई-गोवा या मार्गावरील वंदे भारत ट्रेनमधून सध्या ७० टक्के प्रवासी प्रवास करतात. रेल्वेकडून या दोन मार्गाला जोडण्याचा प्लान आखला जात आहे. मुंबई-गोवा आणि गोवा मंगळुरू या दोन वंदे भारत ट्रेन कॅन्सल करत मुंबई-गोवा-मंगळुरू या एकाच मार्गावर वंदे भारत चालवण्याचा रेल्वेचा मास्टरप्लॅन आहे.

मुंबई-मंगळुरू मार्गावर वंदे भारत, प्रवाशांची मागणी Strong demand for Mumbai-Mangaluru train services

मुंबई-मंगळुरू या मार्गावर वंदे भारत सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मुंबई आणि मंगळुरू या मार्गावर धावणाऱ्या गाड्या केरळपर्यंत वाढवल्यास मोठा प्रतिसाद मिळू शकतो. पर्यटन आणि व्यावसायाला चालना चांगली मिळू शकेल. त्यामुळे मुंबई-मंगळरू या मार्गावर सुरूवातील वंदे भारत धावण्याची शक्यता आहे.

रेल्वेपुढे आव्हाने काय अन् कोणती? Proposed schedule and challenges

मुंबई-मंगळुरू या मार्गावर वंदे भारत सुरू करण्यासाठी रेल्वेला काही आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, त्यामधील प्रमुख प्रश्न हा वेळापत्रक कसं असेल. मुंबई-गोवा मार्गावर धावणारी वंदे भारत सीएसएमटी स्थानकातून सकाळी ५.२५ ला निघते. ही वंदे भारत गोव्याला दुपारी एक वाजता पोहचते. पण मुंबई आणि मंगळुरू मार्गावर वंदे भारत सुरू केल्यास कोणत्या वेळी ट्रेन पोहचणार, प्लॅटफॉर्म कोणता असेल? यासारखे प्रश्न असतीलच. मंगळुरूवरून सकाळी वंदे भारत निघाली तर दुपारी गोव्यात पोहचेल, त्यानंतर रात्री मुंबईत पोहचण्यासाठी ९ वाजतील. त्यावेळी मुंबईच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी असते. सर्व ट्रेन त्या काळात येत असतात, त्यामुळे वंदे भारतला प्लॅटफॉर्म उपलब्ध कसा करता येईल, हे नियोजन करावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT