मुंबई-अहमदाबाद खासगी तेजस एक्सप्रेस बंदचं Saam Tv
देश विदेश

मुंबई-अहमदाबाद खासगी तेजस एक्सप्रेस बंदचं

मुंबईत वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तेजस एक्स्प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन यांच्यावतीने मुंबई Mumbai ते अहमदाबाद Ahmedabad चालविण्यात येणारी खासगी तेजस एक्सप्रेस Tejas Express ६ ऑगस्ट पर्यंत प्रवासासाठी बंदचं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत वाढत्या कोरोनाच्या Corona प्रादुर्भावामुळे तेजस एक्स्प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे देखील पहा -

अनलॉकची सुरुवात होताच मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस १७ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली होती. मात्र प्रवासी मिळत नसल्यामुळे तेजस एक्सप्रेस बंद करण्यात आली होती. त्यानंतर  १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे  निमित्य मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस सुरू केली होती. तेजस एक्स्प्रेसचे प्रवासी संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी पुन्हा एकदा मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस उद्यापासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरुवातीला प्रवाशांकडून मुंबई - अहमदाबाद तेजस एक्सप्रेसला तुफान प्रतिसाद मिळत होता. मात्र कोरोनामुळे या खासगी तेजस एक्स्प्रेसचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच कोरोनाकाळात प्रवासी मिळत नसल्याने अनेकदा ही गाडी बंद करण्याची नामुष्की आयआरसीटीसीवर आली आहे. त्यामुळे तेजस एक्सप्रेसला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत या खाजगी ट्रेनला ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

SCROLL FOR NEXT