पवारांच्या दिल्लीवारीवर पडळकर म्हणाले...रात गेली हिशोबात! (पहा व्हिडिओ)

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे
Gopichand Padalkar - Sharad Pawar
Gopichand Padalkar - Sharad Pawar - Saam Tv

सोलापूर : भाजपचे BJP विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे NCP अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरद पवार साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत.शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही. तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे, असं पडळकर म्हणाले.पडळकर सोलापुरात Solapur आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. BJP Mla Gopichand Padalkar Criticism on NCP Leader Sharad Pawar

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते, मात्र राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहेत, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली. त्याचबरोबर मी शरद पवार आणि अजित पवारांशी या मुद्दयावरुन भांडतो, असं ही गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून समाजासमाजमध्ये तेढ वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.मूठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत.ओबीसींना दिलेले संविधानिक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न करत आहेत.ओबीसींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

Gopichand Padalkar - Sharad Pawar
केंद्रावर अवलंबून राहणार नाही; घरोघरी लसीकरणाबाबत ठाकरे सरकारचा निर्णय

शरद पवारांच्या दिल्लीतील बैठकीवरुन टीकास्त्र

''मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत, त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळं पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा,'' असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी पवारांची खिल्ली उडवली.

ओबीसी उपमुख्यमंत्री का नाही?

ओबीसी आमदारांची संख्या भाजपमध्येच सगळ्यात जास्त आहे. विश्वासघाताने जे सरकार आलं त्या सरकारमध्ये ओबीसी का उपमुख्यमंत्री झाला नाही? धनंजय मुंडे किंवा अमोल कोल्हे हे का प्रदेशाध्यक्ष झाले नाहीत? हे ओबीसी का समोर आले नाहीत?सरकार नसताना ओबीसींसाठी आंदोलन करण्यासाठी धनंजय मुंडे,छगन भुजबळ,अमोल कोल्हे,जितेंद्र आव्हाड रस्त्यावर उतरले, मात्र उपमुख्यमंत्रिपदा साठी अजित पवार पुढे आले,''असा हल्लाबोल पडळकरांनी यावेळी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com