Multibagger Share Saam TV
देश विदेश

Multibagger Stock: 25 पैशांच्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल; फक्त 3500 रुपयांची गुतंवणूक बनली एक कोटी

CAPLIN POINT LAB शेअरमध्ये ज्यांनी केवळी 3500 रुपये गुंतवले होते ते गुंतवणूकदार आज करोडपती झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : कमी वेळेच जास्त पैसे मिळाले तर कुणाला नको असतात. म्हणूनच लोक गुंतवणूक करताना कमी वेळेत जास्त रिटर्न मिळतील तिथेच गुंतवणूक करतात. शेअर मार्केटमधील गुंतवणूक अत्यंत जोखमीचा मानली जाते, मात्र अनेकदा ती फायद्याची ठरले. कमी गुंतवणुकीत बक्कळ रिटर्न देणारे अनेक स्टॉक्स आहेत. म्हणून अनेकजण अशा पेनी स्टॉक्सच्या नेहमी शोधात असतात. (Share Market)

मल्टीबॅगर स्टॉक्स हे गुंतवणूकदारांचे नशीब बदलणारे ठरतात. असाच एक स्टॉक आहे ज्यांना गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. CAPLIN POINT LAB च्या शेअर्समुळे अनेकांना हा फायदा झाला आहे. CAPLIN POINT LAB शेअरमध्ये ज्यांनी केवळी 3500 रुपये गुंतवले होते ते गुंतवणूकदार आज करोडपती झाले आहेत. (Latest Marathi News)

CAPLIN POINT LAB चे शेअर्स 21 फेब्रुवारी 2003 रोजी केवळ 25 पैसे या नाममात्र किमतीत उपलब्ध होते. परंतु आता त्याची किंमत 726 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच सुमारे 20 वर्षांत या स्टॉकने गुंतवणूकदारांना सुमारे 2900 पट परतावा देण्याचे काम केले आहे. म्हणजे गुंतवणूकदारांनी दोन दशकांपूर्वी या शेअरमध्ये केवळ 3500 रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता ती गुंतवणूक 1 कोटी रुपयांपर्यंत वाढली असेल.

कॅपलिन पॉइंट लॅब ही फार्मा कंपनी आहे, जिचा व्यवसाय आफ्रिकन देशांमध्ये पसरलेला आहे. या फार्मास्युटिकल कंपनीचा व्यवसाय 1990 मध्ये सुरू झाला आणि त्याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. या कंपनीची सूची 1994 मध्ये भारतीय शेअर बाजारात झाली. त्याच्या IPO ला गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला.

2022 च्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली होती. 6 जानेवारी 2022 रोजी त्याची किंमत 888.45 रुपये या वर्षीच्या उच्चांकावर पोहोचली होती. मात्र अलीकडच्या काळात स्टॉकचे मूल्य घसरले आहे. मे 2022 मध्ये शेअरची किंमत 600 रुपयांच्या पातळीवर कोसळली होती, जी आता 726 रुपयांच्या पातळीवर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : अणुशक्ती नगर मधून सना मलिक पिछाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT