5G Network
5G Network  Saam Tv
देश विदेश

5G Service : मुंबई, दिल्ली, कोलकातानंतर या शहरांमध्ये Jio 5G सेवा सुरु, वेलकम ऑफरमध्ये फ्री मिळेल अनलिमिडेट डेटा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : 4G सेवेनंतर देशातील ऑनसाईन सेवांमध्ये मोठी प्रगती झालेली पाहायला मिळाली आहे. मात्र 4G नंतर आता 5G ची चर्चा आहे. 5जीच्या इंटरनेट स्पीडमुळे भविष्यात खुप फायदा होणार आहे. 5जी इंटरनेट सेवेत रिलायन्स जिओ (Reliance Jio) महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. आपल्या 5G सेवेचा विस्तार करताना, Jio ने राजस्थानमधील राजसमंद आणि चेन्नई येथे आपली सेवा सुरू केली आहे. जिओचे प्रेसिडंट आकाश अंबानी यांनी नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरातून 5G सेवा आणि Jio True 5G आधारित वाय-फाय सेवा सुरू केली आहे. यासह एकूण 6 शहरांमध्ये Jio 5G सेवा सुरू झाली आहे.

यापूर्वी जिओने दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये आपली 5G सेवा सुरू केली आहे. आता Jio True 5G सेवा 6 शहरांमध्ये उपलब्ध आहे. जिओच्या प्रतिनिधींनी याबाबत आधीच माहिती दिली होती. आकाश अंबानी यांनी नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात Jio True 5G आणि Jio True 5G वाय-फाय सेवा सुरू केली आहे. या शहरांमध्ये राहणाऱ्या युजर्सनाही जिओच्या वेलकम ऑफरचा लाभ मिळणार आहे. टप्प्याटप्प्याने सेवेचा विस्तार केला जाईल.

काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानीही श्रीनाथजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर राज्यात 5जी सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले. 2015 मध्ये Jio 4G लाँच करण्यापूर्वी मुकेश अंबानी श्रीनाथजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. (Maharashtra News)

भारतात ऑक्टोबरमध्ये 5G सेवा सुरू झाली. Jio आणि Airtel या दोघांनीही भारतात त्यांची 5G सेवा सुरू केली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीनंतर आता चेन्नई आणि राजस्थानमधील नाथद्वारामध्ये जिओ ट्रू 5जी सेवा सुरू करण्यात आली आहे. यूजर्स 5G नेटवर्कवर 1Gbps पर्यंत स्पीड अनुभवू शकतात.

एअरटेलने 8 शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली आहे. मात्र, या सेवा अद्याप संपूर्ण शहरात उपलब्ध नाहीत. उलट ते काही स्पॉट्सवरच लाइव्ह करण्यात आले आहेत. जर तुम्ही या शहरांमध्ये राहत असाल आणि तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल तर तुम्हाला 5G सेवेचा अनुभव घेता येईल. 5G रिचार्ज प्लॅन्सची घोषणा सध्या केली नसली तरी जिओ आपल्या यूजर्सना जिओ वेलकम ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत, यूजर्सना अनलिमिडेट 5G डेटा अॅक्सेस करण्याची संधी मिळेल. केवळ निवडक यूजर्सनाच या सेवाचा लाभ घेता येणार आहे. माय जिओ अॅपला भेट देऊन यूजर्स जिओ वेलकम ऑफरसाठी नोंदणी करू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

SCROLL FOR NEXT