World's Top 10 Rich : जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून मुकेश अंबानी बाहेर पडले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार या यादीत मुकेश अंबानी 11व्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 85 अब्ज डॉलरवर आली आहे.
मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ही मार्केट कॅपच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. बऱ्याच काळापासून मुकेश अंबानी ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या जगातील टॉप 10 श्रीमंत लोकांच्या यादीत समाविष्ट होते, परंतु गेल्या आठवड्यात त्यांची संपत्ती कमी झाल्यामुळे ते या यादीतून बाहेर पडले आहेत.
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची सध्या 85.2 अब्ज डॉलरची संपत्ती आहे आणि त्यांची संपत्ती मागील आकडेवारीपेक्षा 778 लाख डॉलरने कमी झाली आहे. जर तुम्ही या वर्षाची स्थिती पाहिली तर मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत 1.93 बिलियनची घट झाली आहे.
तिसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी
त्याच वेळी, भारताचे आणखी एक अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी हे एकमेव भारतीय आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, गौतम अदानी 121अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. 2023 च्या सुरुवातीपासून त्याची एकूण संपत्ती सुमारे 188 दशलक्ष डॉलरने वाढली आहे.
कोण आहे ज्याने मुकेश अंबानींना मागे सोडले
ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये, फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट 186 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहेत. बर्नार्ड अर्नॉल्टच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत सुमारे 1.95 डॉलर बिलियनची वाढ झाली आहे.
2023 च्या सुरुवातीपासून त्याच्या संपत्तीत सुमारे 23.9 अब्ज डॉलरची वाढ नोंदवण्यात आली आहे. याशिवाय, टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क 139 अब्ज डॉलर्ससह टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. 2023 च्या सुरुवातीपासून त्यांची संपत्ती सुमारे 1.64 अब्ज डॉलरने वाढली आहे.
जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत 'या' श्रीमंतांचा समावेश
सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नॉल्ट आहे, ज्यांच्याकडे 186 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क 139 अब्ज डॉलर्ससह टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत.
गौतम अदानी तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती १२१ अब्ज डॉलर आहे. Amazon चे संस्थापक जेफ बेझोस 120 अब्ज डॉलर्ससह चौथ्या क्रमांकावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स 111 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत.
याशिवाय, ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या यादीत वॉरन बफे 105 अब्ज डॉलर संपत्तीसह सहाव्या, लॅरी एलिसन 97.5 अब्ज डॉलर संपत्तीसह सातव्या, लॅरी पेज 90.9 अब्ज डॉलर संपत्तीसह आठव्या, सर्गेई ब्रिन 87.2 नवव्या स्थानावर आहेत. तर 86.1 बिलियन डॉलरच्या एकूण मालमत्तेसह स्टीव्ह बाल्मर 10व्या स्थानावर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.