MHADA : म्हाडाच्या लाभार्थ्यांचा शेवटचा हफ्ता माफ; खोणी, शिरढोणच्या ४ हजार लाभार्थ्यांना दिलासा

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आलाय.
MHADA
MHADASaam TV
Published On

अजय दुधाणे

Ambernath News : अंबरनाथ तालुक्यातील शिरढोण आणि खोणीच्या म्हाडाच्या लाभार्थ्यांचा शेवटचा १० टक्क्यांचा हफ्ता माफ करण्यात आलाय. पझेशन देण्यास विलंब झाल्यानं खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आलाय. तब्बल ४ हजार सदनिकाधारकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळालाय.

MHADA
Gold Hallmark: तुमच्याकडील सोनं बनावट? राज्यात दीड कोटींपेक्षा जास्त किमतीचे बनावट हॉलमार्क केलेलं सोनं जप्त

अंबरनाथ (Ambernath) तालुक्यातील शिरढोण आणि खोणी गावात म्हाडाच्या (Mhada) कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रत्येकी २-२ हजार सदनिका बांधण्यात आल्या आहेत. या घरांची लॉटरी २०१८ मध्ये काढण्यात आली होती. २०२१ मध्ये या घरांचं पझेशन लॉटरी विजेत्यांना देण्यात येणार होतं. मात्र त्यावेळी घरं पूर्णपणे तयार नसल्यानं पझेशन लांबणीवर पडलं.

दुसरीकडे म्हाडाचे पैसे ६ हप्त्यात भरावे लागत असल्यानं विजेत्यांनी पैसे भरले, तरी पझेशन मात्र मिळालं नव्हतं. त्यामुळं बँकेचं वाढतं व्याज, घराचं भरावं लागणारं भाडं, आणि लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेकारीची कोसळलेली कुऱ्हाड अशा संकटात लॉटरी विजेते सापडले होते.

MHADA
Bacchu Kadu Accident Update: अपघात की घातपात? अपघातानंतर पहिल्यांदा बच्चू कडू स्पष्टच बोलले

यावर तोडगा काढण्यासाठी या सदनिका विजेत्यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना साकडं घातलं होतं. त्यानुसार खासदार श्रीकांत शिंदे यांनी मे २०२२ मध्ये म्हाडा अधिकाऱ्यांसह शिरढोण आणि खोणी या दोन्ही ठिकाणी स्वतः जाऊन सदनिका विजेत्यांची भेट घेतली होती.

सदनिका विजेत्यांनी त्यावेळी केलेल्या मागणीनुसार खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा करत अखेर हा लाभार्थ्यांचा शेवटचा १० टक्क्यांचा हप्ता माफ करून घेतलाय. याचा फायदा तब्बल ४ हजार सदनिकाधारकांना होणार असून यामुळे सदनिकाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com