MP Rahul Shewale  Saam TV
देश विदेश

Rahul Shewale : खासदार राहुल शेवाळेंची ठाकरे गटाच्या 'सामना' मुखपत्राला मानहानीची नोटीस; काय आहे कारण?

खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाच्या 'सामना' दैनिकाला मानहानीची बजावली आहे

Shivaji Kale

Rahul Shewale News : शिंदे गट आणि ठाकरे गटातील कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाच्या 'सामना' दैनिकाला मानहानीची बजावली आहे. सामना दैनिकातून बदनामी झाल्याचा आरोप करत नोटीस बजावली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गट आणि ठाकरे गटात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यातही जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. त्यानंतर आता खासदार राहुल शेवाळे यांनी देखील ठाकरे गटाविरुद्ध हल्लाबोल सुरू केला आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी थेट ठाकरे गटाच्या 'सामना' मुखपत्राला मानहानीची नोटीस बजावली आहे.

ठाकरे गटाच्या 'सामना' मुखपत्रात 'राहुल शेवाळेंची कराचीत हॉटेल, रियल इस्टेट व्यवसाय' या ठळक मथळ्याखाली वृत्त दिलं होतं. या वृत्तानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी बदनामी केल्याचा आरोप केला आहे. बदनामी केल्याचा आरोप करत राहुल शेवाळे यांनी 'सामना' वृत्तपत्राला मानहानीची नोटीस बजावली आहे.

ठाकरे गटाच्या सामना वृत्तपत्रात 'राहुल शेवाळेंची कराचीत हॉटेल, रियल इस्टेट व्यवसाय' या मथळ्याखाली २९ डिसेंबर २०२२ रोजी वृत्त आलं होतं. ठाकरे गटाच्या हिंदी दैनिक 'दोपहर का सामना' या वृत्तपत्रातही हे वृत्त छापून आलं होते. तसेत सामना वृत्तपत्रात शेवाळे यांच्यावर दुबईतील तरुणीने गंभीर केल्याचाही उल्लेख आहे. या वृत्तानंतर राहुल शेवाळे यांनी 'सामना'ला मानहानीची नोटीस बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT